काँग्रेसचा रडीचा डाव उधळला

Congress-Gandhi-Election शंका घेणाऱ्यांना चपराक

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
अग्रलेख
 
 
 
Congress-Gandhi-Election काहीही झाले तरी मतदार आपल्याला कौल देणार नाहीत, याची खात्री असल्याने निवडणुकीच्या वर्षभर आधीच काँग्रेसने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष रणमैदानात आपण भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करू शकत नाही, याची पुरेपूर जाणीव असल्याने काँग्रेसने देशात अपप्रचार सुरू केला होता. Congress-Gandhi-Election निवडणुकांमध्ये मतदान हे यंत्रांद्वारे अर्थात ईव्हीएमच्या माध्यमातून न घेता ते मतपत्रिकांद्वारे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली होती. हिंमत असेल तर मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका लढवून दाखवाव्या, असे आव्हानही काँग्रेसने भाजपाला दिले होते. कारण नसताना ईव्हीएमबाबत अपप्रचार सुरू करून मतदारांच्या मनात संभ्रम पसरविण्याचे कारस्थान काँग्रेसने केले. Congress-Gandhi-Election पण, त्याला यश आले नाही. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावताना जुनी स्थिती आता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसने सुरू केलेला रडीचा डाव आपोआप उधळला गेला आहे. Congress-Gandhi-Election स्वत:ची सत्ता असताना जनहिताची कोणतीही कामे केली नाहीत, सेक्युलॅरिझमच्या नावावर देशात, जातीय दुहीची बीजं पेरली, धर्माच्या नावावर मुस्लिमांच्या मनात हिंदूंबाबत दहशत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, देशात सामाजिक सौहार्द कायम टिकणार नाही यासाठीच सत्तेचा उपयोग केला आणि स्वत:ची राजकीय पोळी शेकून घेतली, हे आता जनतेला चांगले कळले आहे.Congress-Gandhi-Election
 

Congress-Gandhi-Election 
 
Congress-Gandhi-Election ईव्हीएमचे बटन दाबून मिळालेल्या मतांशी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची जुळवणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने शंका घेणाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली आहे. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकते, ही बाब सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने शंका घेणाऱ्यांचे पितळही उघड पडले आहे. Congress-Gandhi-Election ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात आलेले सर्व प्रश्न फेटाळून लावतानाच बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची जुनी व्यवस्था अंमलात आणली जाऊ शकत नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केल्याने देशात उर्वरित टप्प्यांमधील मतदान ईव्हीएमद्वारेच पार पडण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. व्यवस्थेच्या कोणत्याही पैलूवर डोळे बंद करत अविश्वास व्यक्त केल्याने विनाकारण संभ्रम निर्माण होतो आणि विकासाच्या मार्गात अडथळे येतात, असे जे न्यायालयाने म्हटले आहे, ते सत्य आहे. ज्या व्यवस्थेच्या भरवशावर काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या, त्याच व्यवस्थेवर आता लोकसभेच्या निवडणुकीत अविश्वास व्यक्त करून काँग्रेसने देशात संशयाचे वातावरण तयार करीत पराभवाच्या भीतीने आलेले नैराश्यच प्रदर्शित केले आहे.Congress-Gandhi-Election  २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेसला सपशेल नाकारले, मोदींना स्वीकारले. मोदींनी जनतेचा विश्वास सार्थ ठरवत आता २०२४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा केलेला संकल्प आणि त्याला मिळत असलेला मतदारांचा प्रतिसाद काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकवणारा आहे.
 
 
स्वत: निवडणुुका जिंकल्या तर मतदान यंत्र चांगले आणि पराभव पत्करावा लागला तर यंत्रात दोष, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घ्यायला नको. पण, सत्तेबाहेर राहून कासावीस झालेल्या काँग्रेसने काहीही करून मोदींना, संघाला आणि भाजपाला बदनाम करण्याचा विडाच उचललेला दिसतो. नकारात्मक भूमिका घेतली तर आपण जनतेची दिशाभूल करून मोदींना पराभूत करू शकतो, अशी विकृत मानसिकता बनवून घेतलेल्या काँग्रेसला सततच्या पराभवातून काहीच शिकता आले नाही, हे स्पष्ट झाले आहे. Congress-Gandhi-Election प्रादेशिक पक्षांची कुबडी घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेसला यंदाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे. निवडणुकांची घोषणा होण्याआधीच पंतप्रधान मोदी आणि भाजपाने प्रचाराचे मैदान गाजवत काँग्रेसला घटनाक्रमाचा अंदाज दिलाच होता. काँग्रेस अंधारात चाचपडत असताना मोदींनी लख्ख प्रकाशात ‘अब की बार चार सौ पार' असा नारा देत देशात चैतन्य निर्माण केले होते. मोदींच्या या नाऱ्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांवर एकप्रकारचे मानसिक दडपण आले आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच मोदी समर्थकांमध्ये उत्साह संचारल्याचे देशाने पाहिले. Congress-Gandhi-Election ४०० जागा मिळाल्या तर जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करता येतील, ही भूमिका मोदींनी पंतप्रधान या नात्याने स्पष्ट केली असल्याने काँग्रेसकडून घटना बदलाचा जो आरोप केला जात आहे, त्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही.
 
 
 
भाजपाने ४०० जागा जिंकण्याची घोषणा हवेत केलेली नाही. गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने विकासाची जी प्रचंड कामे केलीत, त्याआधारेच भाजपाकडून मते मागितली जात आहेत. संपूर्ण देशभर मोदीमय वातावरण आहे. पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी कमी झाली असली, तरी कौल भाजपालाच मिळणार, हे उघड आहे. Congress-Gandhi-Election मतांचा टक्का घसरला म्हणून काँग्रेस व इतर विरोधकांनी आनंदित होण्याची आवश्यकता नाही. कमी मतदानाचा फटका विरोधी पक्षांनाही बसू शकतो, याचा त्यांना विसर पडतोच कसा? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच देशात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून अपप्रचार सुरू आहे. मोदी आता घटना बदलणार आहेत, संविधान बदलले तर देशात पुुन्हा निवडणुुकाच होणार नाहीत, ही शेवटची निवडणूक ठरेल, अशा वावड्या उठवून जनतेत संभ्रम निर्माण करायचा आणि स्वत:ची राजकीय पोळी शेकायची, हा काँग्रेसचा धंदा आता जनता कायमचा बंद पाडणार, हेही स्पष्ट दिसते आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना घटनेत ८० वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या, याचा सोयीस्कर विसर जर राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांना पडला असेल तर मतदार निवडणुुकीतून त्यांना जागा दाखवून देतील, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. Congress-Gandhi-Election एवढ्या संख्येत घटनेत दुरुस्त्या करण्याची काँग्रेसला आवश्यकताच काय होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली, ती बदलण्याचा प्रश्नच येत नाही, बदलण्याचा अधिकारही कुणाला नाही.
 
 
 
पण, सरळ मार्गाने निवडणुका जिंकता येत नाही आणि जिंकल्या नाही तर सत्ता मिळणार नाही, या भयगंडाने ग्रासलेल्या काँग्रेस आणि विरोधकांनी आता अपप्रचाराचे शस्त्र हाती घेत स्वत:च घटनेची पायमल्ली सुरू केली आहे. Congress-Gandhi-Election अपप्रचार करणे हे घटनेच्या विरोधात आहे. जी गोष्ट कधी घडूच शकत नाही अशा गोष्टीबाबत जनतेत संभ्रम निर्माण करणे, हा खरे तर राष्ट्रद्रोह मानला पाहिजे. सातत्याने मोदी, संघ आणि भाजपाला शिव्या घालण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी आपण काय करणार आहोत, कोणत्या प्रभावी योजना राबविणार आहोत; तो सविस्तर कार्यक्रम जर काँग्रेस आणि विरोधकांनी जनतेपुढे सादर केला तर जनता सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते. पण, कायम नकारात्मक भूमिका घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलात तर मतदार जागा दाखवून देतात, याचा अनुभव वारंवार घेऊनही काँग्रेसचे चरित्र सुधारत कसे नाही, याचेही आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे. Congress-Gandhi-Election निवडणुका म्हटल्या की आरोप आणि प्रत्यारोप आलेच. लोकशाहीत त्याला स्थानही आहे.
 
 
 
पण, आरोप करताना मर्यादांचे पालन केले गेले पाहिजे. राजकीय पक्षांची जी विश्वसनीयता आहे, ती टिकूून राहिली पाहिजे. विश्वसनीयता टिकवूून ठेवण्याचे मोठे आव्हान आज आपल्या लोकशाहीपुढेही उभे ठाकले आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेले नाही. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे काँग्रेसने अनिर्बंध सत्ता गाजवली. Congress-Gandhi-Election सत्ताकाळात केलेल्या चुकांचे फळ मतदारांनी काँग्रेसला दिले. भाजपाला परिश्रमाचे फळ दिले. सत्ता मिळाली त्याचा उपयोग भाजपाने देशाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी केल्याने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळेल, याचा विश्वास भाजपाला वाटतो आहे. या विश्वासातूनच मोदींनी ‘चार सौ पार' हा नारा दिला आहे. भाजपाच्या पारड्यात किती जागा टाकायच्या याचा फैसला शेवटी सार्वभौम जनताच करणार आहे. काँग्रेसने अपप्रचार करून स्वत:ची विश्वसनीयता गमावण्याचे कारण नाही.