बोलाची कढी, बोलाचाच भात !

Corruption-NGO-India त्यांची प्रतिमा होता होता एवढी मलिन !

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
कानोसा 
 
 
- अमोल पुसदकर
 
 
Corruption-NGO-India सध्या निवडणुकांमुळे सर्वत्र विविध पुढाऱ्यांची भाषणे सुरू आहेत. भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला म्हणतो की, भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. ज्यांनी शेजाऱ्या-पाजाऱ्यांची, मित्रांची-नातेवाईकांची साधी साधी कामे केलेली नाही तो म्हणतो की, युवकांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोकून द्यावे. Corruption-NGO-India चौकामध्ये एखादे भांडण झाले किंवा थोडीशी गर्दी जमा झाली तर जो ती गर्दी पाहूनच पळून जातो, असे लोक म्हणतात, युवकांनी सैन्यामध्ये सामील व्हावे. जे दैनंदिन चालणाऱ्या कामात दैनंदिन सहभाग सोडाच; परंतु ज्यांचा साप्ताहिक, मासिक सहभागही राहत नाही असे लोक दैनंदिन कार्य करणाऱ्या लोकांना दैनंदिन कार्याचे महत्त्व, ते करण्याची आवश्यकता समजावून सांगणारे भाषण करतात. Corruption-NGO-India बेशिस्त लोक शिस्तबद्धतेच्या गोष्टी सांगताना दिसतात. ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा' अशा स्वरूपाची एक म्हण प्रचलित आहे. ‘नाव समशेर बहाद्दर आणि माणूस अगदीच भेकड' अशा पद्धतीचे अनेक विरोधाभास आपल्याला समाजामध्ये दिसतात. म्हणूनच ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोण झाला?' असे म्हणावेसे वाटते.Corruption-NGO-India
 
 
 
Corruption-NGO-India
 
 
पूर्वीच्या काळी ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे म्हटले जात होते. कारण समाजामध्ये असे अनेकानेक प्रकारांचे आदर्श होते; ज्यांचे जीवन, ज्यांचे वागणे आणि ज्यांचे बोलणे हे समाजासाठी आदर्श होते. आजच्या भाषेत ज्यांना ‘रोल मॉडेल' म्हणता येईल अशा पद्धतीचे हे लोक होते. Corruption-NGO-India समाज नेहमी अशाच लोकांचे अनुसरण करीत असतो. प्रत्येक क्षेत्राला एका श्रेष्ठ आदर्शाची आवश्यकता असते. ‘देखणी ती पाऊले जी स्वस्तिपद्मे चालती,' असेही म्हटले गेले आहे. अशा पावलांच्या मागून चालण्यामध्ये समाजाला नेहमीच धन्यता वाटत आलेली आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी नि:स्वार्थपणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान केले अशांच्या जीवनाकडे पाहून, त्यांच्या त्यागाकडे पाहून समाजातून हजारो लोक स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन उठले. Corruption-NGO-India देशाच्या स्वातंत्र्याकरिता बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांना विश्वास होता की, आमच्या मागून आमचेच भाऊबंद आमच्यासारखेच या मार्गावर पुढे येतील व भारत मातेच्या मुकुटावर स्वातंत्र्याचा कुंकुम तिलक लावतील. ‘सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते' अशा पद्धतीचा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता.
 
 
१९४७ साली देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आदर्शांची पडझड सुरू झाली. समाजामध्ये स्वार्थकेंद्रितता मोठ्या प्रमाणावर बळावली. भ्रष्टाचार हा ‘शिष्टाचार' झाला. त्यागमय जीवन जगणारे, तत्त्वांनी वागणारे कालबाह्य होऊ लागले. ‘चलता है, जमाने के साथ चलो' ही मानसिकता वाढीला लागली. Corruption-NGO-India सर्व गोष्टींशी जुळवून घेणारे, हवेप्रमाणे दिशा बदलणारे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे हे समाजाचे नेतृत्व करायला लागले. राजकीय नेते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीचा समज एकेकाळी होता. त्यांची प्रतिमा होता होता एवढी मलिन झाली की, पांढरे कपडे घालणारे राजकीय नेते म्हटले की, हे नक्कीच भ्रष्टाचारी असतील, लांड्यालबाड्या यांनी केलेल्या असतील, असा सर्वसामान्य माणसांचा समज असतो. काहीही शिक्षण नसताना, अंगी विशेष कोणती योग्यता नसताना हे लोक मोठमोठ्या पदांवर जाऊन बसतात कसे, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला नेहमी सतावत राहिलेला आहे. Corruption-NGO-India हुशार लोकांना लाळघोटेपणा, हाजी-हाजी करूनच आपली हुशारी सिद्ध करावी लागते. तरीही सर्वसामान्य माणूस यांच्याकडे कानाडोळा करून आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक तो संघर्ष करीत राहतो.
 
 
परंतु, ज्या वेळेस अशा लोकांकडून लोकांचे मार्गदर्शन केले जाते त्यावेळेला मात्र लोकांना कपाळाला हात लावण्याची वेळ येते.
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद म्हणायचे की, ‘मला शंभर तरुण द्या. मी देशाचा चेहरामोहरा बदलवून दाखवतो.' तरुणांमध्ये परिवर्तन आणण्याची शक्ती असते. या शक्तीला जर योग्य दिशा दिली गेली तर त्यातून समाजामध्ये, देशामध्ये योग्य प्रकारचे परिवर्तन घडून येते. तरुण वयात जर विचारांना योग्य दिशा मिळाली तर त्या विचारांसाठी जीवन समर्पित करण्याची, झोकून देण्याची मानसिकता तरुणांची असते. Corruption-NGO-India आपल्या देशामध्ये आज अनेक संघटना चांगले काम करीत असताना दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वाध्याय परिवार, स्वामी नारायण परिवार अशा अनेक संस्थांची नावे घेता येतील. यामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्य करणारे लोक दिसून येतात. यामध्ये सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्य करणाऱ्या  व्यक्तीला जेव्हा पाहते, त्यावेळेस त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे, कार्याचे, त्यागाचे आकर्षण वाटते व त्यालाही वाटते की, आपणसुद्धा असेच कार्य केले पाहिजे. ‘एक दीप से जले दुसरा, दुसरे से जलते अनेक' अशा पद्धतीने श्रेष्ठ कार्याचा हा वसा एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला देण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहते.
 
 
Corruption-NGO-India ज्या देशामध्ये नि:स्वार्थपणे काम करणारे असे हजारो तारकापुंज जीवन जगत राहतील, त्या देशामध्ये आदर्शांची कमतरता पडणार नाही. ‘मेरी झांसी नहीं दूंगी' म्हणणारी झाशीची राणी, हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महाराणा प्रताप, भारताच्या आध्यात्मिक उत्थानासाठी प्रयास करणारे स्वामी विवेकानंद असे अनेकानेक आदर्श भारतासमोर उभे आहेत. अशा भारताला व भारतीय समाजाला आदर्शांची वानवा पडू नये. समाजाने आपल्या आदर्शांच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे. Corruption-NGO-India सिनेमातील नट-नट्या हे अभिनयाचे आदर्श राहू शकतात, जीवनाचे नव्हे. जुगाराची जाहिरात करणारे खेळाडू हे कदाचित खेळाडू म्हणून आदर्श असतील, परंतु जीवनाचे आदर्श ते नाहीत, हे तरुणांनी ओळखले पाहिजे. सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यकत्र्यांचे प्रबोधन करताना ज्यांचे जीवन त्या कार्यासाठी समर्पित आहे अशाच योग्य व्यक्तींना पुढे आणले पाहिजे; जेणेकरून त्यांच्या जीवनाकडे पाहून इतरांच्या मनात नि:संदेह समाजभक्तीचा दीप उजळेल व ‘बोलाचीच कढी...' असे म्हणण्याची पाळी येणार नाही.