सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
- लोकसभेच्या 57 जागांसाठी 25 मेला मतदान

नवी दिल्ली, 
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना Election Commission निवडणूक आयोगाने आज जारी केली. या टप्प्यात 57 जागांसाठी 25 मेला मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेशातील 14, हरयाणातील सर्व म्हणजे 10, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 8, राजधानी दिल्लीतील 7, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 4 जागांवर मतदान होणार आहे. या मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकि‘या सुरू झाली. 6 मे ही अर्ज भरण्याची अंतिम तिथी आहे. 7 मेला अर्जांची छाननी होईल आणि 9 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 25 मेला मतदान होईल.
 
 
Election Commission
 
Election Commission : सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेशातील बस्ती, भदोही, श्रावस्ती, फुलपूर, जौनपूर, लालगंज, प्रतापगड, आजमगड, सुलतानपूर, आंबेडकरनगर, प्रयागराज, डुमरियागंज, मछलीशहर आणि संतकबीरनगर या 14 मतादरसंघांत मतदान होणार आहे. हरयाणातील अंबाला, सिरसा, हिस्सार, कर्नाल, कुरुक्षेत्र, सोनीपत, रोहतक, भिवानी महिंद्रगड, गुडगाव आणि फरिदाबाद येथे, राजधानी दिल्लीतील पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, चांदनी चौक, उत्तर-पूर्व दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली अशा सात मतदारसंघांत मतदान होणार आहे.