पवनुरात जय हो पातालमाताचा गजर

29 Apr 2024 19:55:25
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Galachi Ratha Yatra Festival : तालुक्यातील पवनूर येथील गळाची रथयात्रा महोत्सवाचे आयोजन चैत्र कृष्णपक्ष पंचमी 28 एप्रिलला मोठ्या उत्साहात पार पडली. गावात निघालेल्या शोभायात्रेत जय हो पाताल माताचा गजर होता.
 
 
FSZfD
 
 
पवनूर येथील गावच्या शेवटच्या टोकावर पातालमाता देवीचे मंदिर आहे. हे मंदिर गावचे ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. या मंदिरात अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरा करण्यात येतो. चैत्र महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गळाची रथयात्रा साजरी करण्यात येते. गावातील देवी भक्त अरुण लांडे आणि प्रवीण दाभेकर यांना बैल बांधतात त्या लाकडी ‘जू’ला उंचावर लटकवून गावात परिक्रमा काढली जाते. बैल बंडीपासून 50 फूट उंचावर लाकडी ‘जू’वर दोघेही सहकारी त्याला लटकवून गावची प्रदक्षिणा करण्यात आली. यात्रेचा समारोप पातालमाता च्या मंदिरात झाला. दिनेश कोंडलकर, अनुप चौधरी, मारोती दाभेकर,अर्जुन भोयर, सतिश दाभेकर, रमेश कडू, धनराज कोंडलकर, दिनेश इंगळे, विक्रम कडू, आशिष दाभेकर यांनी गळाचा रथ सजवला. पूजेचा मान सुरेंद्र कारणकर, रोशन पांडे, सागर कोंडलकर यांना मिळाला. यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली आवर्जून माहेरी येत असतात. यात्रेच्या दिवशी घरोघरी पाणग्याचा नैवेद्य दाखवला जातो. यात्रेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0