नवी मुंबई एपीएमसीचे नुकसान, 25 जणांविरुद्ध गुन्हे

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
ठाणे, 
Navi Mumbai APMC : नवी मुंबईतील वाशी एपीएमसीतील अनियमिततांमुळे झालेल्या 62 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी पोलिसांनी एपीएमसीच्या 25 पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती अधिकार्‍याने सोमवारी दिली. 2008 ते 2013 या कालावधीत आरोपींनी घेतलेल्या निर्णयामुळे एपीएमसीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप आहे.
 
 
Apmc
 
Navi Mumbai APMC : एपीएमसीच्या विकासाच्या टप्प्यात आरोपींनी 466 व्यक्तींना 4,43,391.66 चौरस फूट क्षेत्रफळाचे गाळे वितरित केले. त्यांच्याकडून दोन हजार रुपये प्रती चौरसफूट लागू दरांऐवजी 600 रुपये प्रती चौरस फूट कमी दर आकारला, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या निर्णयामुळे एपीएमसीचे 62,07,324 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आरोपींनी रेडी रेकनरपेक्षा कमी दराने एफएसआय वितरित केला आणि गाळे धारकांना वाढीव दराने एफएसआय वाटपाची पत्रे दिली, असे अधिकार्‍याने सांगितले.