पंतप्रधान मोदींना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
- दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
 
नवी दिल्ली, 
देवी-देवतांच्या नावाने मते मागणार्‍या PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक लढण्यापासून सहा वर्षे अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. ही याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे आणि याचिकेत कोणतीही गुणवत्ता नसल्याचे न्या. सचिन दत्ता यांनी सांगितले. याचिकाकर्ते वकील आनंद एस. जोंधळे यांनी देवी-देवता आणि मंदिरांच्या नावावर मते मागितल्याबद्दल मोदींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती.
 
 
modissl
 
PM Modi या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे तसेच भादंवि आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हाही केला असल्याचा दावा याचिकेत केला होता. याचिकाकर्त्याने 10 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ही पूर्वकल्पना पूर्णपणे अयोग्य आहे. याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर किंवा त्या प्रकरणासाठी इतर कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट दृष्टिकोन घेण्याचे आणि याचिकाकर्त्याने मागितल्यानुसार तत्कालिक निर्देश जारी करण्यास न्यायालयाला परवानगी नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.