कर्नाटकातील चामराजनगरमध्ये आज पुन्हा मतदान

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
चामराजनगर,  
Lok Sabha elections कर्नाटकातील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील हेन्नूर येथील इंदिगनाथ गावातील मतदान केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था असताना पुन्हा मतदानाला सुरुवात झाली, ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. चामराजनगर लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते, मात्र दोन गटात हाणामारी झाल्याने मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली.

Lok Sabha elections
हाणामारीची घटना पाहता निवडणूक आयोगाने या भागात पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पायाभूत सुविधांचा विकास नसल्याचं कारण देत ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.  प्राथमिक माहितीनुसार, एक गट मतदानाच्या बाजूने होता, तर दुसरा गट बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता. यावरून दोन गटात हाणामारी झाली आणि दगडफेकीत ईव्हीएम मशीनचे नुकसान झाले. Lok Sabha elections हाणामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शनिवारी सांगितले की, मतदान केंद्र क्रमांक 146 वर शुक्रवारी झालेले मतदान रद्द मानले जाईल.
केवळ कर्नाटकातच नाही तर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातही फेरमतदान झाले आहे. एकीकडे मणिपूरमधील 11 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले, तर दुसरीकडे अरुणाचलच्या 8 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले.