थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा प्रवेश

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
थायलंड,
Thomas Cup Badminton Tournament गतविजेत्या भारताने इंग्लंडचा 5-0 असा पराभव करत थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध भारताची सुरुवात चांगली झाली होती. एचएच प्रणॉयने हॅरी हुआंगचा 21-15, 21-15 असा पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीच्या लढतीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बेन लेन आणि सीन वेंडी यांचा 21-17, 19-21, 21-15 असा पराभव केला. माजी जागतिक नंबर वन किदाम्बी श्रीकांतने नदीम दळवीचा 21-16, 21-11 असा पराभव करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताचा दुसरा दुहेरी संघ एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी रोरी ईस्टन आणि ॲलेक्स ग्रीन यांचा 21-17, 21-19 असा पराभव करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
 
 
thomas
शेवटच्या सामन्यात किरण जॉर्जने चोलन कायनचा 21-18, 21-12 असा पराभव केला. शेवटच्या गट सामन्यात भारताचा सामना 14 वेळचा चॅम्पियन इंडोनेशियाशी होणार आहे. Thomas Cup Badminton Tournament टीम इंडियाने गेल्या वर्षीही चमकदार कामगिरी करत अनेक मोठ्या संघांना पराभूत केले होते. याआधी भारतीय महिला संघाने उबेर चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.