रामनामाचे पवाडे, तुकोबांचे...!

Tukaram Maharaj-Shriram राम राहिला मानसी। ध्यानी चिंतन जयासी।

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
वेध
 
 - अनिरुद्ध पांडे
Tukaram Maharaj-Shriram रामनामाचे पवाडे। अखंड ज्याची वाचा पढे।
धन्य तो एक संसारी। रामनाम जो उच्चारी।।
रामनाम गर्जे वाचा। काळ आज्ञाधारक त्याचा।
तुका म्हणे रामनामी। कृतकृत्य जालो आम्ही।।Tukaram Maharaj-Shriram 
या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ओळी. संत साहित्य ही महाराष्ट्राच्या जीवनातील अनन्यसाधारण बाब आहे. ज्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान संतसाहित्य आविष्कृत करते, तो वारकरी संप्रदाय महाराष्ट्र संस्कृतीचा गाभा आहे. Tukaram Maharaj-Shriram ज्ञानदेवांनी या संप्रदायाची तत्त्वज्ञानात्मक पायाभरणी केली आणि तुकोबा त्यांचे भावकाव्यात्म कळस झाले, असे तुकोबांच्या शिष्य बहिणाबाई यांनी एका रूपकातून मांडले आहे. Tukaram Maharaj-Shriram ते असे...
संतकृपा झाली। इमारत फळा आली। ज्ञानदेवे घातला पाया। उभारिले देवालया।
नामा तयाचा किंकर। तेणे रचिले आवार। जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
 
 
 
Tukaram Maharaj-Shriram
 
 
Tukaram Maharaj-Shriram हे आपले सारेच संत महाकवीच म्हणावे इतक्या ताकदीचे कवी होते. कबीर, तुलसीदास, सूरदास या हिंदी संतांचा विचार केल्यास भारतवर्षातील सारेच संत हे नुसतेच समाजसुधारक नव्हते, तर महाकवीही होते, हे दिसून येईल. कळसाचे दर्शन घेतले की देवदर्शनाचे पुण्य लाभते, अशी आध्यात्मिक मान्यता आहे. म्हणजे संत तुकारामांचा अभ्यास करा, म्हणजेच कळसाचे दर्शन घ्यायचे असे आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आपल्या देशातील सारेच संत प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या लिखाणात रामकाव्य, रामभक्ती ठिकठिकाणी डोकावत असते. Tukaram Maharaj-Shriram संत तुकाराम महाराजांच्या अभंगरूपी काव्यातही ‘राम' दिसत असतो असाच ठायीठायी. आपल्या मराठमोळ्या तुकोबारायांनी,
राम कहे सो मुख भला रे। बिन रामसे बीख।
रामराम कहे रे मन। औरसुं नहीं काज।
बहुत उतारे पार। आधे राख तुका की लाज।।
 
 
 
ही भाषा कुठून आत्मसात केली, हे देवच जाणे. तुकोबांची ही हिंदी भाषा कोणाच्या सहवासामुळे फुलून येते काय माहीत. पण संत परंपरा ही फक्त महाराष्ट्राची नव्हती तर साऱ्या देशाची होती आणि ती एकमेकांशी चांगलीच जुळून होती, हे यावरून दिसते. Tukaram Maharaj-Shriram देशभरातील संत परंपरा हा एक अभ्यासाचा विषय आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येकच संत हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या प्रत्येक संताचा अभ्यासकांनी स्वतंत्र अभ्यास केला आहे. अनेकांनी संत अभ्यासून डॉक्टरेट मिळविल्या आहेत तर दुसरीकडे एकाच संतावर अनेकांनी प्रबंध लेखन करून डॉक्टरेट मिळविल्या आहेत. संत कबीर हे समाजातील अनिष्ट चालीरीतींवर प्रहार करणारे, राम-कृष्णांचे परमभक्त, लोकांचे कान टोचणारे जगातले सर्वश्रेष्ठ व्यंग्यकार होते, असे हिंदी भाषेतील जाणकार मानतात. हिंदी भाषेत सर्वाधिक डॉक्टरेटचे विषय म्हणजे कबीर, तुलसीदास हे संतच आहेत. मराठीचा विचार केल्यास फारशी वेगळी स्थिती असण्याची शक्यता नाही. नुसतेच संत नाहीत, तर महाकवी संत...!Tukaram Maharaj-Shriram
 
 
 
खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।।
क्रोध अभिमान केला पावरणी। एका एका लागतील पायी रे।।
असे भक्तीच्या आनंदाबद्दल सांगणारे संत तुकोबाराय सोप्या शब्दांत अभंगातून आपले म्हणणे मांडत. Tukaram Maharaj-Shriram ते आपल्या समकालीन संतांना जगाने संतत्व कसे बहाल केले होते हेसुद्धा आवर्जून श्रद्धेने आणि कौतुकाने सांगतात.
‘सिपियाचा पोर एक खेळीया नामा। तेणे विठ्ठल बसवंत केला रे।
एक घाई खेळता तो न चुकेचि कोठे। तया संत जन मानवले रे।।
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा। सोपान आनंदे खेळती रे।।Tukaram Maharaj-Shriram
रामा बसवंत कबीर खेळीया। जोडा बरसा मिळाला रे।।
ब्राह्मणाचा पोर खेळीया एका भला। तेणे जन खेळकर केला रे।।'
या शब्दांत तुकोबा संत परंपरेबद्दल सांगतात.
 
 
 
हे सारेच संत राम व कृष्ण या आपल्या देवतांप्रती फारच श्रद्धाळू आणि हळवे होते. Tukaram Maharaj-Shriram
रामरूप केली। रामे कौसल्या माऊली।।
राम राहिला मानसी। ध्यानी चिंतन जयासी।।
राम होय त्यासी। संदेह नाही भरवसा।।
ऐसा नित्य राम ध्याय। तुका वंदी त्याचे पाय।।
अशी भावनाप्रधान तुकोबारायांची भक्ती, श्रद्धा आहे रामाप्रती.Tukaram Maharaj-Shriram
‘रामराम उत्तम अक्षरे। कंठी धरिली आपण शंकरे। कैसी तारक उत्तम तिही लोकां। हलाहल शीतल केलें शिवा देखा।।' किंवा  ‘राम म्हणतो काम क्रोधांचे दहन। होय अभिमान देशोधडी।। राम म्हणता तुटेल भावबंधन। नये श्रम सीण स्वप्नास ही।।'  असे अभंग ‘तुकाराम गाथे'त ठायीठायी आहेत. सर्वच भारतीय संतांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श भक्तिभावाने समाजासमोर ठेवला आहे आणि समाजानेही तो आत्मसात केला आहे, निरंतर...Tukaram Maharaj-Shriram
९८८१७१७८२९