सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारांची उसळी

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
मुंबई :
जागतिक भांडवली बाजारांतील सकारात्मक संकेत तसेच बँकिंग आणि पायाभूत क्षेत्रांत झालेल्या दमदार खरेदीच्या बळावर आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी शेअर बाजारांनी उसळी घेतली. मुंबई stock markets शेअर बाजाराचा निर्देशांक 941 अंकांनी झेपावून 74,671 अंकांवर बंद झाला.
 
 
stock markets
 
stock markets : दिवसभराच्या सत्रात निर्देशांकाने 990 अंकांची उसळी घेतली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 223 अंकांनी उसळून 22,643 या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात आज इंड्सइंड, अल्ट्रा टेक सिमेंट, भारतीय स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला.