तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
BJP entry गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू, श्री कन्यका नागरी सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य विजय आईंचवार तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी बुधवार, 3 एप्रिल रोजी भाजपात प्रवेश घेतला.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. येथील हॉटेल क्रॉऊन येथे बुधवारी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत मुनगंटीवार यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला.BJP entry मुनगंटीवार यांची विकासात्मक दृष्टी आणि झंझावाती कार्यशैलीवर विश्वास ठेवून आईंचवार व पोटदुखे यांनी हा पक्षप्रवेश केला असून, लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाकरिता पूर्ण शक्तिनिशी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागील चार-पाच दिवसात अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.