डॉ. प्रभुदास रामटेके पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :03-Apr-2024
Total Views |
नागपूर,
Dr.Prabhudas Ramteke जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ द्वारा फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसीय तिसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन थायलंड येथील सनबीम होटेल मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी घोषित झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉ. प्रभुदास रामटेके यांना महामंडळातर्फे दहाव्या वर्धापन दिवस समारंभात देण्यात  आला. 
 
ram
  
हा  पुरस्कार त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान व आकोटचे डॉ. विलास तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.Dr.Prabhudas Ramteke डॉ. प्रभुदास रामटेके हे दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक असून तरुण भारत दैनिकाचे संपर्क मित्र आहेत. यापूर्वी त्यांना नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक, मुंबईच्या अपना उत्सव मध्ये नाँर्थ ईस्ट सांस्कृतिक केंद्राचा प्रतिनिधी, लोकमत युवा महाविद्यालय/पालक प्रतिनिधी म्हणून पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले होते.
 
सौजन्य : डॉ. प्रभुदास रामटेके,संपर्क मित्र