हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाच अर्ज दाखल

१५ उमेदवारांना ६० नामनिर्देशन पत्राचे वितरण

    दिनांक :03-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिंगोली, 
Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी उमेदवारांकडून ८ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. तर १५ उमेदवारांना ६० नामनिर्देशन पत्राचे वितरण केल्याचे सांगितले.
 

hingoli 
 
आतापर्यंत एकूण ८६ इच्छुक उमेदवारांना ३०३ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर चौथ्या दिवशी मंगळवार, २ एप्रिल रोजी ५ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या १० झाली आहे.
 
नामदेव ग्यानोजी कल्याणकर (अपक्ष) यांनी दोन अर्ज, रवी यशवंत qशदे (ओबीसी बहुजन पार्टी) यांनी एक अर्ज, देशा शाम बंजारा (अपक्ष) यांनी एक अर्ज, वसंत किसन पाईकराव (अपक्ष) यांनी दोन अर्ज व नागेश बाबुराव आष्टीकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल qसह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह इतर अधिकारी वकर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे ४ एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. शुक्रवार, ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार असून, सोमवार, ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.