बापाला आव्हान द्यायचे नसते

अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
पुणे, 
Ajit Pawar माझ्यासारख्या कार्यकत्र्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बिबट्यांचा शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासावर आवाज उठवला, ही चूक केली का, असा सवाल करीत, डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना आव्हान दिले. माझ्यासारख्या लहान कार्यकत्र्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना मर्दुमकी दाखवायची असेल, तर ती दिल्लीत दाखवावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचे नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
 
 
Ajit Pawar
 
जुन्नरमधील जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार जुन्नरमध्ये आले होते. Ajit Pawar अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अमोल कोल्हे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्र्याला प्रश्न पडला, मी काय चूक केली? शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली? तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत दाखवा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, बिबट्याच्या त्रासापासून त्यांना मुक्त करा. मात्र, पाडापाडी आणि दमदाटी इतकेच सुरू आहे. काहीही झाले तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही.