अरविंद केजरीवालांना अटक का केली?

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
- सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा
 
नवी दिल्ली, 
स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही, असे स्पष्ट करीत शेवटचा प्रश्न हा मुख्यमंत्री Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी निवडलेल्या वेळेशी संबधित आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच केजरीवाल यांना अटक का करण्यात आली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ईडीला केली तसेच याबाबत शुक्रवारी उत्तर द्यावे, असा आदेशही दिला. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल याचिकेवर मंगळवारी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली.
 
 
Arvind Kejriwal
 
 
केंद्र सरकार अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचे Arvind Kejriwal केजरीवाल यांनी अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. केजरीवाल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना झालेली अटक ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आणि संघराज्यावर आधारित लोकशाहीच्या तत्त्वांवर हल्ला आहे. या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज का केला नाही, असा सवाल न्यायासनाने केला होता. यावर केजरीवालांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, केजरीवाल यांना 21 मार्च राजी अटक झाली. कलम 19 अन्वये अटक करण्याची काय गरज होती. केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला गेला नाही. डिसेंबर 2023 पर्यंत 10 कागदपत्रांमध्ये (सीबीआय आरोपपत्रे आणि ईडी तक्रारीसह) केजरीवालांचे नाव नाही, असे सांगत कलम 50 पीएमएलए द्वारे कोर्टात साक्षीदारांच्या साक्षीदारांच्या जबाबाकडे अ‍ॅड. सिंघवी यांनी लक्ष वेधले होते.