लाथ मारायला पाहिजे होती पक्षाला

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
- इम्तियाज जलील यांचा नसीम खान यांना टोला

मुंबई, 
मुस्लिम समाजावर अन्याय झाला म्हणून एवढेच तुम्ही दुःखी झाला असाल तर, लाथ मारायला पाहिजे होती पक्षाला. प्रचारकपदाचा राजीनामा देण्याचा दिखावा कशाला, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार Imtiaz Jalil इम्तियाज जलील यांनी काँग्रेस नेते नसीम खानवर निशाणा साधला.
 
 
Imtiaz Jalil
 
उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नसीम खान इच्छूक होते. पण, काँग्रेसने तिथून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीम खान नाराज झाले आणि नंतर त्यांनी मुस्लिम कार्ड खेळत, काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मुस्लिम उमेदवार का नको? असे सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मला विचारत आहेत. मी याच कारणांमुळे मुसलमानांसमोर जाऊ शकत नाही. माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही, अशा आशयाचे पत्र नसीम खान यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांना लिहून पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जलील बोलत होते.
 
 
 
काँग्रेस किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाही मुस्लिमाला तिकीट देणार नाही, हे आम्हाला माहिती होते. आता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला. तुम्हाला इतका राग आला, वेदना झाली, दुःख झाले होते, तर तुम्ही पक्ष सोडायला हवा होता, लाथ मारायला पाहिजे होती पक्षाला. हे काय लोकांना दाखवायला बघा मला दुःख झाले आहे, त्यामुळे मी आता या मंचावरून त्या मंचावर जाणार नाही आणि भाषण देणार नाही. यातून लोकांची सहानुभूती मिळत नाही, असे खडे बोल Imtiaz Jalil जलील यांनी सुनावले.
 
 
आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ
अख्ख्या महाराष्ट्रात एक मुस्लिम उमेदवार न दिल्याने लोकांमध्ये मुंबईच्या मुस्लिमांमध्ये मविआविरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे आताही संधी गेली नाही. या, आम्ही तुम्हाला मुंबईतील मागाल तेथून एमआयएमचे तिकीट देतो, संधीचे सोने करा, अशी ऑफर Imtiaz Jalil इम्तियाज जलील यांना दिली.