दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव शिवसेनेच्या उमेदवार

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
Yamini Jadhav दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून याच क्षेत्रातील भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. पाचव्या टप्पयात होऊ घातलेल्या मुंबईच्या सहा जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार आता घोषित झाले आहेत. यात भाजपा ३ आणि शिवसेना ३ जागांवर लढत आहेत. भाजपाने मिहीर कोटेचा आणि पीयूष गोयल यांचे नाव अगोदरच जाहीर केले होते.
 
 
Yamini Jadhav
 
नुकतेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. शिवसेनेने दक्षिण-मध्य मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी पूर्वीच जाहीर केली होती. मंगळवारी उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधव या दोघांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली आहे.  Yamini Jadhav मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला आधीच पसंती दिली होती. यामिनी जाधव यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे तीन-तीन आमदार असल्याने दोघांची ताकद तशी दिसायला तुल्यबळ दिसत असली तरी, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि यामिनी जाधव यांचे जमिनीस्तरावरील काम आणि आदित्य ठाकरेंविषयी वरळीत असलेली नाराजी तसेच मुंबई महापालिकेतील गैरव्यवहार, भ्रष्टाचार, विकासाला बसलेली खिळ, रस्त्यावरील गड्डे आणि तुंबणारे पाणी या सर्व मुद्यांचा फटका उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना बसण्याची शक्यता आहे.
मुबंईतील लढत
१. दक्षिण मुंबई
यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सांवत (ठाकरे गट)
२. ईशान्य मुंबई
मिहीर कोटेजा (भाजपा) विरुद्ध संजय पाटील (ठाकरे गट)
३. दक्षिण-मध्य
राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
४. उत्तर मुंबई
पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध अद्याप जाहीर नाही
५. उत्तर-मध्य मुंबई
उज्ज्वल निकम (भाजपा) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
६. उत्तर-पश्चिम
रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)