गोलू तिवारी हत्या प्रकरण, दोघांना अटक

30 Apr 2024 19:37:17
गोंदिया, 
golu tiwari रेती व्यावसायीक रोहित उर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी यांची 22 एप्रिल रोजी आर्थिक देवाणघेणाव व जुन्या वैमनश्यातून गोळ्या झाडून हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना रविवारी अटक केली असून एकूण आरोपींची संख्या 9 झाली आहे.
 

wewew 
golu tiwari जुने वैमनश्य व आर्थिक देवाणघेवाणीवरून दोन दुचाकींवर असलेल्या चौघांनी कुडवा नाक्याजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर रोहित ऊर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी (38, रा. गजानन कॉलनी) वर गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली होती. रविवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंकज ऊर्फ मोनू गोविंद अग्रवाल (34) रा. गोंदिया व मुनेश तिलकचंद नागपुरे (19) रा. कन्हारटोला-पांढराबोडी असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली असून यापूर्वी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
Powered By Sangraha 9.0