...शेतकर्‍यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या !

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

    दिनांक :30-Apr-2024
Total Views |
वाशीम, 
kharif crops जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकर्‍यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.खरीप हंगाम २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सभेकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सभेमध्ये माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले.
 

rtrtrt 
  
kharif crops खरीप हंगाम २०२४ ची पुर्वतयारी म्हणुन ४ लाख ५ हजार १८० हेटरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३ लाख ७ हजार २७५ हेटर, तुर ६१ हजार हेटर, कपाशी ३० हजार ८२० हेटर, खरीप ज्वारी ६०० हेटर, मुग २ हजार १०० हेटर, उडिद २ हजार ५०० हेटर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता लागणार्‍या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली.सोयाबीन या प्रमुख पिकाकरीता जिल्ह्याचेचे बियाणे बदलाचे प्रमाण एकुण २९ टक्के असून, त्याकरीता ६६ हजार ८३२ क्विंटलची बियाणे मागणी नोंदविण्यात आली आहे व उर्वरीत लागणारे बियाणे शेतकर्‍याकडे घरगुती पध्दतीने जतन करण्यात आलेले आहे. कापुस बीटी बियाण्याची १ लाख ५४ हजार १०० पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली असून, मे अखेरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत सर्व पिकाचे बियाण्याची उपलब्धता होईल व कुठलीही टंचाई भासणार नाही असे बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाकरीता रासायनिक खताची ७५ हजार ६० मे. टन खताची मागणी करणयत आली असून, ७२ हजार ३०० मे. टनाचे आवंटन कृषि आयुक्तालयाकडुन मंजुर करण्यात आले आहे. खताचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल. त्याप्रमाणे नॅनो युरीया १८ हजार ५०० बॉटल्स व नॅनो डिएपी ५ हजार बॉटल्सचे आवंटन मंजुर असून, शेतकर्‍यांनी नॅनो युरीया व डिएपीचा वापर करण्याबाबत प्रसार व प्रचार करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनिक खताचा खरीप २०२४ करीता डीएपी ५९० मे.टन, युरीया ९०० मे. टन बफर स्टॉक करण्याचे नियोजन असून, आज अखेर डीएपी १७५ मे टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. पेरणीपुर्व घरगुती बियाण्याची उगवणक्षमता तपासणी व बिजप्रक्रिया सयंत्राद्वारे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार प्रसार करुन मोठया प्रमाणात बिजप्रक्रिया करुनच पिकाची पेरणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाची बीबीएफ यंत्राद्वारे किंवा सरी वरंबा पध्दतीने लागवड करण्याबाबतचे जनजागृती करुन मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी सभेदरम्यान दिली.