तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Nagesh Patil Ashtikar हिंगोली लोकसभा मतदार संघांतर्गत हदगाव हिमायतनगर, उमरखेड महागाव वसमत हिंगोली कळमनुरी व किनवट या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत उबाठा सेनेचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील (आष्टीकर) यांनी 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर एकीकडे भाजपा पक्षाने शिवसेना शिंदे गटाला ही जागा सोडली असता भाजपा मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक योगी श्याम भारती यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागेश पाटील यांच्या समवेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधव जवळगावकर, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय खडसे उपस्थित होते. Nagesh Patil Ashtikar जिल्हाधिकारी पापडकर यांच्या कक्षात नागेश पाटील यांनी पक्षाचा एबी फॉर्म लावत उमेदवारी दाखल केली. तसेच हिंगोली शहरातील गांधी चौकात सभा घेऊन पक्षाची धारा दानवे यांनी मांडून भाजपा सेना युतीवर व त्यांच्या कार्यप्रणालीवर कडाडून टीकास्त्र डागले.