भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

    दिनांक :05-Apr-2024
Total Views |
बुलडाणा,
Government of India Scholarship : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येऊ शकणार आहे.
 
SC
 
 
 
सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि अनुसूचित प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अनुसूचित प्रवर्गाकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.
 
मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाही, अश्या विद्यार्थी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. तसेच सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित योजनेसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी भरून घ्यावेत.
 
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांना महा डीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदनपत्र भरण्याबाबत सूचित करावे. सदर मुदतीत मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.