नागपूर ,
Kalidas University राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, तिरुपति द्वारा दि २८ ते ३१ मार्च २०२४ या दरम्यान आयोजित अखिल भारतीय संस्कृत छात्र प्रातिभ समारोहामध्ये कविकुलगुरू-कालिदास-संस्कृत-विश्वविद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांची चमू सहभागी झाली होती. या चमूने शैक्षणिक व सांस्कृतिक विविध स्पर्धांमध्ये एकूण ०७ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले.संस्कृत जानपद नृत्य स्पर्धा - द्वितीय पुरस्कार, न्याय वैशेषिक भाषण तृतीय पुरस्कार चिन्मय मुंजे, आगम भाषण तृतीय पुरस्कार रिद्धी कुलकर्णी, धर्मशास्त्र भाषण - तृतीय पुरस्कार - वेदश्री कुलकर्णी, पुराणेतिहास भाषण - सांत्वना पुरस्कार - नूपुर कुलकर्णी,योगासन स्पर्धा (महिला) - तृतीय - अश्विनी बावणे,योगासन स्पर्धा ( पुरुष) - हर्षल बांगडे.कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी या यशाबद्दल संतोष व्यक्त केला असून ज्या उद्देशाने गुरुकुलाची स्थापना झाली तो उद्देश विद्यार्थी पूर्ण करीत आहेत. आमच्या या विद्यार्थांचा आम्हाला अभिमान असून ते खरे शास्त्रदूत आहेत. या विद्यार्थ्याना घडविणाऱ्या सर्व अध्यापकांचे देखील मी अभिनंदन करतो. कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या यशाची कमान कायम उंचावणारे विद्यार्थी व अध्यापक हे आमच्यासाठी गौरवास्पद आहेत.

कांचन गडकरी यांनी साधला नागरिकांशी संवाद
सदर स्पर्धेकरिता प्रा. श्रीवरदा माळगे व प्रा. सुकांत प्रामाणिक हे विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
Kalidas University या यशस्वी व भरीव कामगिरीकरिता सर्व चमूची पूर्वतयारी व सिद्धता प्रो. कविता होले, प्रो. पराग जोशी, डॉ. जयवंत चौधरी व डॉ. राघवेंद्र भट, डॉ सचिन द्विवेदी आणि अन्य गुरुकुल अध्यापकांच्या यांच्या मार्गदर्शनात पार पडली.सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कुलगरू प्रो हरेराम त्रिपाठी ,कुलसचिव प्रो कृष्णकुमार पांडेय सर्व अधिष्ठाता यांनी हार्दिक अभिनंदन केले.
सौजन्य: अनघा आंबेकर,संपर्क मित्र