मानोरा,
agriculture तालुयातील बेलोरा विठोली येथील महिला शेतकरी निता उपाध्ये यांनी पतीच्या साथीने आपल्या शेतात मेहनत करून बेलोरा गावी शेतीला जोडधंदा म्हणून दाळ मिळ हा लघुउधोग गेल्या चार वर्षांपासून चालू केला आहे. दाळ मिलमुळे शेतकर्यांना फायदा होतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून मी उत्पन्न वाढीची नवीन वाट शोधली असल्याचे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले.
महिलांसह इतर सुशिक्षित शेतकर्यांसाठी हे एक आदर्श उदाहरण असून, बेलोरा येथील डाळ मिल हा लघुउद्योग पाहण्यासाठी व विविध प्रकारच्या दाळी निर्मितीसाठी शेतकरी गर्दी करित आहेत. शेती दिवसेंदिवस परवडत नाही, असे म्हणून अनेकांनी शेती सोडली. परंतु शेतीसोबत शेती पुरक जोडधंदे निवडले तर उत्पन्न वाढीस चालना मिळू शकते असे मत निता उपाध्ये यांनी व्यक्त केले. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक उद्योग आहे सर्वांनी नवनवीन प्रयोग करून शेतीला जोडधंदा करावा. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर एक महिला शेतकरी काय करू शकते, शिवाय शेतीला जोडधंदा काय असतो व कसा करावा, हे निता उपाध्ये यांनी दाखवून दिले. सध्याच्या काळात शेती नापिकीच्या व निसर्गाच्या प्रकोपात ग्रासली आहे.agriculture शेती दिवसेंदिवस तोट्यात येत असल्याने बदलत्या ऋतुचक्राप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची संकटेही शेती उत्पादनावर परिणाम करीत असल्याने प्रत्येक शेतकर्याने शेतीला पूरक जोड व्यवसाय करण्याचा आग्रह महिला शेतकरी उपाध्ये यांनी केला आहे.