अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

05 Apr 2024 18:27:43
वाशीम, 
minor girl शाळेत पेपर देण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळून नेणार्‍या आरोपीस येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी २ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील दहाव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी १९ मार्च २०२२ रोजी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती.
 
 

xgj 
 
परंतु उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर पालकांना समजले की, मुलीला काटा येथील जगदीश अंभोरे याने फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी वाशीम शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून जगदीश अंभोरे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.minor girl चौकशीअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल. न्यायालयात आरोपी व फिर्यादी पक्षाने बाजू मांडल्यानंतर आरोपी जगदीश अंभोरे विरुद्ध अल्पवयीन मुलीस जबरीने पळवून नेल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला विद्यमान प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी दोन वर्ष सश्रम करावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अधिक कारावास अशी शिक्षा सुनावली .या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभीयोता सुचिता प्रभाकर कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.
 
 
Powered By Sangraha 9.0