नागपूर,
Debate Competition दयानंद आर्य कन्या महाविद्यालयात कै. पद्मादेवी खुबचंदानी यांच्या स्मरणार्थ आर्य विद्या सभेचे कोषाध्यक्ष भूषण खुबचंदानी यांच्या सौजन्याने सुशिक्षित बेरोजगारी हा सध्याच्या तरुणांसाठी उच्च शिक्षणात अडथळा आहे का? की वरदान? या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शीला खेडीकर,कामठीच्या पोरवाल महाविद्यालयाचे डॉ. तुषार चौधरी यांनी काम पाहीले. या स्पर्धे 12 महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रथम पारितोषिक सिंधू महाविद्यालयाच्या तिशा चक्रधर, द्वितीय पारितोषिक आशुतोष तिवारी आणि तृतीय पारितोषिक खुशी तूरकमाने आणि दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सांघिक चषक देण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन खुशी तुरूकमाने,परिचय आनंद पोथीवालआणि आभार प्रदर्शन दिव्या पांडे यांनी केले.
डॅडीला कोर्टातून दिलासा !
यावेळी निर्मला खुबचंदानी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
Debate Competition तसेच आर्य विद्या सभेचे महाविद्यालयीन प्रभारी वेदप्रकाश आर्य व आर्य विद्या सभेचे सचिव राजेश लालवाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
सौजन्य:प्रविण डबली,संपर्क मित्र