गडचिरोली,
ashok nete मागील 2 टर्मपासून खासदार असलेले गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पिरीपा महायुतीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार खासदार अशोक नेते यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. शुक्रवारी चामोर्शी येथे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते जनसमुदायाला मार्गदर्शन करताना बोलत होते.
ashok nete या सभेला राज्याचे अन्न औषध व प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा नेते माजी डॉ. आमदार नामदेव उसेंडी, लोकसभा विस्तार बाबुरावजी कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्ह्याच्या महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. चंदाताई कोडवते, किसान आघाडीचे रमेश भुरसे, किसान मोर्चाचे रमेश बारसागडे प्रणय खुणे, अरुण हरडे, ओबीसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर, महामंत्री मधुकरराव भांडेकर, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लीलाधर भरडकर, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भास्कर बुर यांचसह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.