‘चला गावाकडे जाऊ’ अभियान

पिंपरखेड कृषी विभाग

    दिनांक :07-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 1 एप्रील ते 30 एप्रील दरम्यान कृषी विभागाकडून ‘चला गावाकडे जाऊ’ अभियान राबविण्यात येत असून शुक्रवार, 5 एप्रिल रोजी तालुक्यातील पिंपरखेड येथे जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बाराटे, कृषी उपविभागीय अधिकारी राजकुमार रणवीर यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. लिंबोळी अर्क, कंपोस्ट खत, सोनहिरा खतासह विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली. सक्षम ग्राम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
RTRT
 
RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बाराटे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर,तालुका कृषी अधिकारी पाटील, मंडळ कृषी अधिकारी वाळके, डफ महाराज व गुरुदेव मंडळ यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहायक संगेवार, कृषी सहायक अशोक खरात, कृषी सहायक शेवाळकर यांच्यासह पिंपरखेडच्या सरपंच ललिता ज्ञानदेव साखरे, उपसरपंच छाया मनोहर राठोड, माजी सरपंच पिंटू पाटील, निलू वाकोडे, विजय वाकोडे, सूर्यकांत सरोदे ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.