नक्षलवादाचा नायटा !

Naxalism-TCOC समर्थन करणारे बुद्धिजीवी होते

    दिनांक :08-Apr-2024
Total Views |
वेध
 
 
- अभिजित लिखिते
 
Naxalism-TCOC छत्तीसगडमधील बिजापुरात अलिकडेच दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांना मिळालेले हे एक मोठे यश आहे. Naxalism-TCOC साधारणपणे मार्च ते जुलै या कालावधीत नक्षलवाद्यांकडून ‘टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' अर्थात् टीसीओसी राबवले जाते. नक्षलवादी राबवत असलेला शहीद सप्ताह बहुतांश लोकांना माहीत आहे. मात्र, टीसीओसीबाबत फारशी माहिती नाही. Naxalism-TCOC मार्च ते जुलै हा कालावधी सुरक्षा दलांसाठी शहीद सप्ताहापेक्षा कितीतरी जास्त पटीने आव्हानात्मक मानला जातो. याच कालावधीत सर्वाधिक हल्ले सुरक्षा दल आणि पोलिसांवर केले जातात. नक्षलवाद्यांच्या संभाव्य कारवायांची खबरबात ठेवून सुरक्षा दलाला प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे या कालावधीत सर्वाधिक चकमकी झडल्याचे दिसून येते. Naxalism-TCOC मात्र, आता सुरक्षा दल नक्षलवादाच्या नायट्याचे उच्चाटन करीत आहेत. दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य भारतातील जंगलांमध्ये या काळात पानगळ सुरू होते. जंगलात लांबपर्यंत पाहणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाया आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून नक्षलवाद्यांच्या हालचालीही वाढतात.Naxalism-TCOC
 
 
 
Naxalism-TCOC
 
(संग्रहित छायाचित्र) 
 
सुरक्षा दलांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांच्यावर जास्तीत जास्त हल्ले करण्यासाठी नक्षलवादी मार्च ते जुलै या कालावधीत ‘टीसीओसी' राबवतात. Naxalism-TCOC खरे पाहिले तर हे तीन महिने नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अघोषित युद्धच असते. मात्र, या अघोषित युद्धात गुप्तचर प्रणाली सरस असलेल्याची सरशी होते. त्यामुळे पोलिस खबèया ठरवून सामान्य आदिवासींची हत्या करण्यासारखी भ्याड कृत्य याच कालावधीमध्ये केली जातात. हत्यांच्या माध्यमातून आदिवासींच्या मनात दहशत निर्माण करायची आणि आपल्या हालचालींची माहिती बाहेर पडू न देण्याची नक्षलवाद्यांची व्यूहरचना असते. Naxalism-TCOC सुरक्षा दलांचे पारडे जड झाल्यावर काही दिवस शांततेत काढून त्यानंतर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी नक्षलवादी एखादा मोठा हल्ला घडवू शकतात. त्यामुळे सुरक्षा दलांसमोरील आव्हान आणखी कठीण असते. मुळात आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे सुरू झालेली नक्षलवादी चळवळ आता माओवादात बदलली आहे. Naxalism-TCOC नक्षलवादी चळवळ सुरू करण्याचा हेतू या माओवादी रक्तरंजित संघर्षात राहिलेला नाही.
 
 
 
बंदुकीच्या जोरावर सरकार उलथवून माओवादी विचारसरणीचे सरकार स्थापन करणे केवळ इतकाच हेतू या माओवाद्यांचा आहे. त्यांना जंगलांमधील आदिवासींचे काहीही देणेघेणे नसते. केवळ आदिवासींचा वापर या माओवाद्यांकडून केला जात असतो. भारताच्या विरोधात युद्ध लढण्यासाठी त्यांना मनुष्यबळ येथूनच सहजासहजी उपलब्ध होते. Naxalism-TCOC आदिवासींना भूलथापा देऊन, तत्त्वाच्या मोठमोठ्या गप्पा मारून माओवादी लढाईत खेचले जाते. मेला तर आदिवासी मरेल, पण त्याने हल्ले चढवून नुकसान केल्यास फायदा आपला, इतकीच या माओवाद्यांची मानसिकता असते. त्यामुळेच माओवाद्यांनी आता आदिवासी भागांत होणाऱ्या विकासाला विरोध करणे सुरू केले आहे. ठिकठिकाणची विकासकामे जाळपोळ करून बंद पाडली जातात. आदिवासी भागांत रस्त्यांचे जाळे तयार होऊ देत नाहीत. Naxalism-TCOC शहरांमधून कुठून तरी या जंगलातील माओवाद्यांवर नियंत्रण ठेवले जाते, त्यांना आदेश दिले जातात. आदेश देणारे सुरक्षित राहतात. फारसे समोर येत नाहीत. माओवादी विचारसरणीतील पोकळपणा, फोलपणा जाणवू लागल्याने आता शरणागती पत्करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
 
 
नक्षलवादी चळवळ म्हणा अथवा माओवादी, देशासाठी घातक ठरणारे, देशाचे तुकडे करणारा दहशतवाद हा काँग्रेसच्या काळातच फोफावला आहे. ईशान्येतील बंडखोर, काश्मीर आणि पंजाबमधील दहशतवाद, नेपाळच्या सीमेपासून ते आंध्रप्रदेशपर्यंत माओवाद्यांचा रेड कॉरिडोर काँग्रेसच्या काळातच वाढले, ही वस्तुस्थिती आहे. Naxalism-TCOC काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकार चालवण्यासाठी सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या घटनाबाह्य राष्ट्रीय सल्लागार परिषदेत नक्षलवादाचे समर्थन करणारे बुद्धिजीवी होते, असा आरोप केला जायचा. कॉम्रेड सुरेंद्र नावाच्या माओवाद्याने कॉम्रेड प्रकाशला लिहिलेल्या पत्रात काँग्रेसच्या एका नेत्याचा फोन नंबर होता, असा आरोपही झाला आहे. Naxalism-TCOC देशद्रोहाच्या आरोपात दोषी धरण्यात आलेले नक्षलवादी विचारसरणीचे डॉ. विनायक सेन यांची योजना आयोगावर नियुक्ती करण्यात आली होती. या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. भाजपाच्या कार्यकाळात नक्षलवादी कारवाया जवळपास ७० टक्क्यांनी घटल्या आहेत. हे आकडेवारीनुसार सिद्ध होते. दहशतवादाचा नायटा कठोर कारवाईनेच नष्ट करणे शक्य आहे.
९०२८०५५१४१