अपूर्ण काम करण्यासाठी व विकासासाठी एक संधी द्या

    दिनांक :08-Apr-2024
Total Views |
- रासा येथील सभेत सपना मुनगंटीवार यांचे आवाहन

वणी,
भाजपा सरकारने या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलीत. मात्र अद्यापही काही कामे बाकी आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण सुधीरभाऊंना संधी द्यावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी Sapna Mungantiwar सपना मुनगंटीवार यांनी केली. त्या रासा येथील जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रासाच्या सरपंच रत्नमाला ठावरी, पोंभुर्णा पंचायत समिती सभापती अलका आत्राम, मीरा पोतराजे व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
y8Apr-Sapana
 
सपना मुनगंटीवार पुढे म्हणाल्या, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुधीरभाऊंचे काम आणि क्षमता पाहिली. जनतेनेदेखील त्यांच्या कामांचा अनुभव घेतलेला आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत त्यांची भरीव कामगिरी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी लोकसेवा हीच ईश्वरसेवा आहे. ते सदैव सगळ्यांच्या मदतीसाठी धावतात. निराधारांसाठी ते एक मोठे आधार आहेत. ते एक सहृदय आणि संवेदनशील माणूस आहेत. प्राणीमात्र आणि पर्यावरणावर त्यांचे विशेष प्रेम आहे. भाऊबीज आणि राखीची ओवाळणी म्हणून सर्वांनी त्यांना मत द्यावे, असे आवाहन Sapna Mungantiwar सपना मुनगंटीवार यांनी केलं.
 
 
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले, सुधीरभाऊ हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. त्यांच्या विकासकामाचे नागरिक प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यांचं नेतृत्व असामान्य आहे. जनसामान्याचा आवाज ते संसदेत नक्कीच उचलतील. सुधीरभाऊ जाती-धर्मांच्या पलीकडचे आहेत. ते लोकसभेत गेल्यानंतर अनेक समस्या दूर होतील, असा मला विश्वास आहे. यावेळी सरपंच रत्नमाला ठावरी, सभापती अलका आत्राम आणि अन्य मान्यवरांची भाषणे झालीत. या सभेत भाजपाचे वणी विधानसभा क्षेत्रातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह रासा व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.