Kaam Chalu Hai Trailer राजपाल यादवने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विनोदी कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आत्तापर्यंत तो चित्रपटांमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवताना दिसला आहे. मात्र, राजपालने अनेकवेळा सांगितले आहे की, मला विनोदी कलाकार म्हणणे आवडत नाही. त्याचा आगामी चित्रपट 'काम चलू है' पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याला विनोदी अभिनेता म्हणणे बंद करतील, अशी शक्यता आहे.
हे आम्ही का म्हणत आहोत, हे आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून समजू शकेल. 'काम चलू है' चित्रपटात राजपाल यादव गंभीर भूमिकेत दिसत आहे. Kaam Chalu Hai Trailer आपल्या लाडक्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन नंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या बापाची भूमिका तो साकारत आहे. ट्रेलरमध्ये तो या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 19 एप्रिल रोजी जी5वर पाहता येईल.