"योग शांतीधाम" येथे मिट्टी स्नान कार्यक्रम संपन्न

09 Apr 2024 14:16:48
 
yogi 
  नागपूर,
Yoga Shantidham श्री योग साधना केंद्र गोरेवाडा  येथे  योग आसन, प्राणायाम, शरीर शुध्दिक्रिया तसेच मिट्टी स्नान कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथील प्रिन्सीपल  डॉ. सुमीता जोगड जैन ह्या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड . नागेश दंडे होते. प.पु. श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून व मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला २५० योग साधक / योगसाधिकांनी भाग घेतला. त्यानंतर सुपाच्य भोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन पंकज बांते यांनी तसेच आभार प्रदर्शन डॉ. गंगाधर कडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता ऍड गंगाधर वैद्य, डॉ. प्रभाकर मस्के, प्रकाश वाडे, सतिश भुरले, प्रभाकर देवके, नितिन जुनघरे, छगन ढोबळे, सौरभ चाहांदे, श्रीमती कुसुम मान, वनश्री वाडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
सौजन्य:अरविंद पाठक,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0