झाले ‘इलेक्शन', जपा ‘रिलेशन'!

Election-Politics-Relation त्यातून साध्य काय होणार ?

    दिनांक :01-May-2024
Total Views |
वेध 
 
 
- विजय निचकवडे
 
 
 
Election-Politics-Relation निवडणुकीपर्यंत हातात हात घेऊन जाणारे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहजतेने सहभागी होणारे निवडणुकीनंतर मात्र काहीसे दुरावल्यागत दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांचे वाभाडे काढणारे नेते नंतर मात्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. Election-Politics-Relation याच नेत्यांसाठी जिवाचे रान करणारे कार्यकर्ते मात्र आपापसांत वैर घेऊन बसतात. निवडणुकीमुळे भाऊबंदकी आणि मैत्रीत येणारे वितुष्ट कुणासाठी, याचा विचार करून संबंध जपण्याची वेळ आली आहे. ‘नेत्यांचे झाले भले, कार्यकर्ते आपसात लढे' हे होण्यापेक्षा ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन' या सूत्राचा अवलंब झाल्यास जिवाला जीव देणारा माणूस कधीच दुरावणार नाही. Election-Politics-Relation राजकारणाची नशा भल्याभल्यांना वेड लावणारी आहे. ज्यांच्यासाठी राजकारण केले जाते, ते या नशेतही स्वतःला सजग ठेवतात. म्हणूनच तर केवळ राजकीय विरोधापुरता त्यांचा विरोध असतो. एरवी एकमेकांचे कट्टर विरोधकही एकाच पंगतीत बसून हसत-खेळत जेवताना दिसतात.
 
 
 
Election-Politics-Relation
 
 
Election-Politics-Relation यावेळी कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर द्वेष किंवा राग दिसत नाही. मात्र, नेत्यांचे हे गुण नेत्यासाठी झगडणारा सामान्य कार्यकर्ता अजूनही अवगत करू शकला नाही. म्हणूनच निवडणूक झाली की कधीकाळी एकमेकांचे जिवलग असलेलेही कट्टर वैरी झाल्याचे अनुभवास येते. हे वैर कुणासाठी याचा जराही विचार त्या सामान्य आणि निरागस कार्यकर्त्याच्या मनाला शिवत नाही. Election-Politics-Relation आपल्या नेत्यासाठी तो कुठल्याही स्तराला जायला तयार असतो. व्यासपीठावरून नेत्याने एखाद्याची उणीदुणी काढली की कार्यकर्ता त्याचीच ‘री' ओढीत चालत राहतो. हा आवेश इतका असतो की, एकमेकांच्या अंगावरही कार्यकर्ते चालून जाण्यास मागेपुढे पाहात नाहीत. त्यातून साध्य काय होणार, याची जराही गोळाबेरीज त्यांच्या जवळ नसते. निवडणूक काळात नेते एकमेकांची लायकी काढून मोकळे होतात; मात्र नंतर कायम संबंध जपण्याची कला त्यांना अवगत असते. Election-Politics-Relation म्हणूनच कट्टर विरोधकही निवडणुकीनंतर एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात.
 
 
 
नेत्यांची हे गुण आमचा कार्यकर्ता अजूनही घेऊ शकला नाही. निवडणुकीने घराघरांत वितुष्ट आल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकाच घरातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते एकमेकांच्या घराचा उंबरठा ओलांडतानाही विचार करतात. Election-Politics-Relation कधीकाळी जिवलग असलेले मित्र निवडणुकीनंतर एकमेकांच्या तोंडावर तोंड पडणार नाही, याची काळजी घेतात. सुख-दुःखात सहभागी होतानाही या दोघांमध्ये आड येते, ते निवडणूक काळातील नेत्यासाठी एकमेकांच्या विरोधात पुकारलेले बंड. निवडणूक नेत्यांची होते, पण दोस्तीत दुरावे आणि गल्लीत दुफळ्या निर्माण होतात. याचा कधी कोणी विचार केला आहे का? Election-Politics-Relation जय-पराजय लागलेच आहे, पण यासाठी आपण आपल्या वर्षानुवर्षांच्या नात्यांना पराभूत करायचे काय? याचा विचार व्हायलाच पाहिजे. कुणाचा नातेवाईक कुण्या एका पक्षातून निवडणूक लढवीत असताना, तो ज्या पक्षात आहे, त्या पक्षावरील त्याच्या निष्ठेबद्दल शंका घेणे कितपत योग्य आहे? निवडणूक ही विचारांची भिन्नता म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. Election-Politics-Relation व्यक्तिगत विरोध या नजरेतून निवडणुकीकडे पाहिले गेल्यास मैत्री आणि रक्ताच्या नात्यांवर निवडणुकीनंतर संकट आल्याशिवाय राहणार नाही.
 
 
नेत्यांच्या निवडणुका सध्या संपल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर त्यांच्या भेटीसाठी आणि गुण्यागोविंदाने नांदणे सुरू झाले आहे. पण निवडणुकीची ती धग अजूनही ग्रामीण भागात कार्यकत्र्यांमध्ये जाणवते. निवडणूक काळात जे काही झाले, त्याचा राग अजूनही अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. Election-Politics-Relation घरे दुरावली आहेत तर चांगल्या मित्रांची मैत्री बाधित झाली आहे. त्यामुळे आता गुलाल कुणाचाही असो, माणसं आपली आहेत, या भावनेतून विचार होणे गरजेचे आहे. ‘इलेक्शन' संपले; आता खरी कसोटी ‘रिलेशन' जपण्याची आहे. प्रत्येक कार्यकत्र्याने निवडणूक काळात घातलेला पक्षाचा चष्मा बाहेर काढून आधी सारखेच वागणे सुरू केल्यास दुखावलेली मने आणि दुरावलेले मित्र नक्कीच जवळ येतील, यात शंका नाही. Election-Politics-Relation ज्या नेत्यांसाठी आपण लढतो, त्या नेत्यांकडून किमान हा गुण तरी कार्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे. समाज माध्यमांवर अनेक संदेश फिरत असतात. मात्र, हा संदेश नक्कीच समाजमन जपणारा असाच म्हणता येईल.
९७६३७१३४१७