‘कळे न हा चेहरा कुणाचा?'

Indian Politics-Elections सर्वोच्च पदाचा संभ्रम अधोरेखित

    दिनांक :01-May-2024
Total Views |
प्रासंगिक
 
 
- राहुल गोखले
Indian Politics-Elections ‘इंडिया आघाडी सत्तेत आली तर पाच वर्षांत पाच पंतप्रधान होतील आणि देश असा चालू शकत नाही,' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. याचे कारण स्पष्ट आहे आणि ते म्हणजे मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण? याचा अद्याप न झालेला उलगडा. वास्तविक, या आघाडीच्या बैठका गेल्या वर्षीपासून सुरू होत्या आणि भाजपा विरोधकांची आघाडी निश्चित होईल, अशा आणाभाका घेतल्या जात होत्या. Indian Politics-Elections मात्र, भूतकाळात अशा आघाड्यांचे जे प्राक्तन तेच यावेळीही कायम राहिले. ते म्हणजे प्रारंभीचा उत्साह आणि नंतरचे मतभेद. नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिली. पैकी नितीश यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. त्यामुळे ते इंडिया आघाडीचा नेतृत्वपदाचा चेहरा असतील, याची शक्यता संपुष्टात आली. Indian Politics-Elections ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे नाव इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सुचविले आणि नंतर लगेचच त्या आघाडीतून बाहेर पडल्या; कारण पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसची लढत भाजपाप्रमाणे काँग्रेस-डाव्यांशीदेखील आहे. शिवाय खडगे यांनीदेखील अगोदर निवडणूक; नंतर नेतेपदाची चर्चा अशी भूमिका घेतल्याने तो मुद्दा तेथेच बासनात बांधण्यात आला.Indian Politics-Elections
 
 

Indian Politics-Elections 
 
 
द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट), समाजवादी पक्ष यांच्याशी त्या त्या राज्यांत काँग्रेसने जागावाटपाचा समझोता केला आहे, हे खरे; पण त्या पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात ना स्वारस्य ना त्यांचा तसा अनुभव; ना त्यांच्या पक्षाची तशी व्याप्ती ना त्यांना तसे जनसमर्थन. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे लोकसभेची निवडणूक लढवत असले, तरी ते काही पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकत नाहीत. Indian Politics-Elections या सगळ्या पृष्ठभूमीवर मोदी यांनी इंडिया आघाडीत सर्वोच्च पदावरून असलेला संभ्रम अधोरेखित केला आहे. त्यावर आघाडीकडे पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे आहेत, असे थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेता येत असली, तरी त्याने वास्तविकता बदलत नाही. २००४ साली केंद्रातील भाजपा सरकारला पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे नेतृत्व सोनिया गांधी करणार हे गृहीतच धरले जात असताना त्यांनी नकार दिला आणि ती धुरा डॉ. मनमोहन सिंग यांना सोपविण्यात आली. Indian Politics-Elections डॉ.सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००९ ची लोकसभा निवडणूक संयुक्त पुरोगामी आघाडीने जिंकली; त्यामुळे निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा चेहरा ठरविणे तितकेसे महत्त्वाचे नाही, असा युक्तिवाद कदाचित करण्यात येईल. काही अंशी त्यात तथ्य; त्याबरोबरच हेही खरे की, २००४ किंवा २००९ आणि २०२४ मधील राजकीय नेपथ्यात मोठी तफावत आहे.
 
 
 
१९९८ पासून केंद्रात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असले, तरी ते एकपक्षीय सरकार नव्हते. सुमारे २०-२५ पक्षांचा सहभाग असणारे ते आघाडी सरकार होते. त्याचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी करीत असले, तरी ते काही भाजपा सरकार नव्हते. १९९९ सालच्या निवडणुका राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या त्या वाजपेयी यांच्या चेहऱ्यामुळेच. १९९९ सालीच लोकसभेत विश्वासदर्शक ठरावात त्यांच्या सरकारचा अवघ्या एका मताच्या अंतराने पराभव झाला होता. तेव्हा वाजपेयी यांना ती सहानुभूती मिळाली होती. मात्र, तो सर्व काळ हा आघाडी सरकारांचा होता. Indian Politics-Elections एकपक्षीय सरकार सत्तेत येणार नाही अशीच जेव्हा स्थिती असते तेव्हा निवडणुकीनंतर सरकारच्या प्रमुखपदाचा चेहरा ठरविला जाण्यात मतदारांना फारसे आक्षेपार्ह वाटत नाही. तथापि, आता ती स्थिती बदललेली आहे. वाजपेयी यांच्यासारखा लोकप्रिय व सर्वमान्य नेता सरकारचे नेतृत्व करीत असला, तरी आपल्या पक्षाची धोरणे पूर्णार्थाने राबविण्यात त्यांना मर्यादा होत्या. नंतर सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला डाव्यांसह अन्य पक्षांच्या नाकदुèया काढाव्या लागल्या होत्या, हे सर्वश्रुत आहे. यातून धोरणांच्या अंमलबजावणीचा होणारा खेळखंडोबा देशाच्या वाटचालीला खीळ घालणारा असतो, असाही अनुभव मतदारांनी घेतला आहे.
 
 
 
Indian Politics-Elections त्यामुळे शक्यतो एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत देण्याकडे मतदारांचा आता कल असतो. आणि म्हणूनच त्या पक्षाची धोरणे प्रभावीपणे राबविण्यासाठी नेत्याचा आश्वासक चेहरा आवश्यक ठरू लागला आहे. हे केवळ लोकसभेच्या निवडणुकांनाच लागू आहे, असे नाही तर विधानसभांच्या निवडणुकांनादेखील लागू आहे. २०१४ नंतर केंद्रातच नव्हे तर अनेक राज्यांत असेच एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा काळ सुरू झाला. साहजिकच नेतृत्वाचा चेहरा कोण हा मुद्दा कळीचा बनला. तथापि, विरोधकांची शोकांतिका ही की, गेल्या १० वर्षांत भाजपा विरोधकांना मोदींना आव्हान देऊ शकेल असा एकही चेहरा शोधता आलेला नाही. Indian Politics-Elections इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आले तर त्यांचा नेता कोण हा प्रश्न निवडणुकीनंतर सोडविता येईल इतका सोपा नाही; तसा तो असता तर अगोदरच इंडिया आघाडीने नेतृत्वाचा चेहरा ठरवून टाकला असता. आघाडीतील सर्वच पक्ष कमी-अधिक प्रमाणावर तितक्याच जागा जिंकलेले असतील तर त्यातील कोणत्या पक्षाच्या नेत्याला अन्य पक्षांच्या तुल्यबळ नेत्यांनी मान्यता द्यावी यावर तोडगा निघणे दुरापास्त ! अडथळ्यांची ही शर्यत टाळायची तर आघाडीत एक पक्ष मोठा असावा लागतो आणि तोही इतका मोठा की, आघाडीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पक्षाला अव्वल पक्षाशी सहजासहजी स्पर्धा करता येऊ नये.Indian Politics-Elections इंडिया आघाडीतील स्थिती तशी दिसत नाही.
 
 
 
मुळात एकपक्षीय सरकारने येणारी राजकीय स्थिरता सोडून आघाडी सरकारला सत्तेत आणून अस्थिरतेला निमंत्रण द्यायचे का, याचा विचार मतदार केल्यावाचून राहणार नाहीत. त्यातही आघाडीचा सर्वमान्य नेता कोण हे गुलदस्त्यात. काँग्रेसला ते नेतृत्व मिळेल असे म्हणावे तर २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या दारुण पराभवाचे स्मरण झाल्याखेरीज राहत नाही. शिवाय सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खडगे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. Indian Politics-Elections राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविली असली, तरी पक्षाचे ते अध्यक्ष नाहीत. ती जबाबदारी टाळणाऱ्या राहुल यांनी पंतप्रधानपदाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहावे हे हास्यास्पद. गांधी कुटुंबीयातील कोणी चेहरा नसेल तर पक्षाला अन्य नेत्याचा शोध घ्यावा लागेल. कोणता नेता आघाडीतील अन्य पक्षांना मान्य होईल, या अगोदर प्रश्न, कोणता काँग्रेस नेता पक्षांतर्गत सर्वमान्य ठरेल, हाही आहे आणि तो क्लिष्ट आहे. राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे विधान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. Indian Politics-Elections यातून संदिग्धता वाढणार की कमी होणार, हा प्रश्न आहे. पटोले यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील निर्णय घेण्याची मुभा नव्हती, असा घणाघात वंचित बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता; त्याला फार काळ उलटलेला नाही. तेव्हा राष्ट्रीय स्तरावरील निर्णयांची माहिती पटोले यांनी द्यावी हे अजब. त्यांच्या विधानावर अद्याप इंडिया आघाडीतून प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत. तेव्हा पटोले यांची विधाने दखलयोग्यही नाहीत, हे स्पष्ट आहे.
 
 
 
Indian Politics-Elections एकाच आठवड्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचे सूतोवाच केले होते. तेव्हा राऊत यांना सुरुवातीस राहुल गांधी यांच्या नावाबद्दल हरकत नव्हती; पण आता त्यांनी पलटी मारली आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली होती; शिवाय राऊत यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही म्हटले होते. आघाडीत जर घटक पक्षांचे नेते परस्परांना गांभीर्याने घेत नसतील आणि आतापासूनच पंतप्रधानपदाच्या नावावरून भांडत असतील तर खरोखरच तशी चेहरा निवडण्याची वेळ आली तर ते कोणत्या थराला जातील, याची कल्पनाच केलेली बरी. Indian Politics-Elections ‘निवडणूक म्हणजे सौंदर्य स्पर्धा नव्हे!' अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. ‘इंदिरा इज इंडिया' असा नारा देणाèया आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची धुरा रातोरात राजीव गांधी यांच्याकडे सोपविणाऱ्या पक्षाच्या नेत्याने असे शेलके विधान करावे, हा निव्वळ दुटप्पीपणा. शिवाय रमेश म्हणतात हे खरे असेल तर राहुल हेच पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत, असे पटोले यांनी जाहीर करण्याचा अर्थ काय? एकूण सावळा गोंधळ आहे. नेता ठरविता येत नाही ही अडचण मान्य न करता त्या मुद्याला बगल देण्यात तात्पुरता दिलासा शोधण्यात हे पक्ष धन्यता मानत आहेत, इतकाच या सर्व सव्यापसव्याचा अर्थ. Indian Politics-Elections सुरेश भटांनी वेगळ्या संदर्भात लिहिलेल्या पंक्ती ‘नेता कोण?' या निर्णयाच्या बाबतीत आघाडीच्या चालढकलीला आणि संभ्रमाला चपखल लागू पडतात... ‘कळे न हा चेहरा कुणाचा?'
९८२२८२८८१९