मालदीवमधील जवानांच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण

    दिनांक :10-May-2024
Total Views |
माले, 
Maldives-India soldiers : भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक मागे घेतले आहेत, असे येथील मालदीव सरकारने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी आपल्या देशातून भारतीय लष्करी जवानांना पूर्णपणे माघारी जाण्यासाठी 10 मे रोजीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतातील सुमारे 90 लष्करी जवानांना परत पाठवण्याची प्रतिज्ञा मुईझ्झू यांनी अध्यक्षीय निवडणूक मोहिमेदरम्यान केली होती. मुईझ्झू हे चीन समर्थक समजले जातात.
 
 
Maldives-India soldiers
 
Maldives-India soldiers : मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली, या वृत्ताला राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वालीद यांनी दुजोरा दिला. मात्र, त्यांनी जवानांची सं‘या सांगितली नाही. तैनात असलेल्या जवानांच्या संख्येची माहिती नंतर जाहीर केली जाईल, असे वालीद यांनी म्हटले आहे. भारताने यापूर्वी भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर्स आणि डॉर्नियर विमानांचे उड्डाण आणि देखभालीसाठी लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात होते. याआधी मालदीव सरकारने सोमवारी यापैकी 51 जवानांना परत पाठवल्याची घोषणा केली. अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत सरकारने यापूर्वी मालदीवमध्ये 89 भारतीय जवानांची उपस्थिती जाहीर केली होती. भारतीय जवानांची पहिली आणि दुसरी तुकडी भारतात परतली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आधीच पत्रकार परिषदेत सांगितले.