अखेर ‘त्या’ चिमुकल्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी

    दिनांक :10-May-2024
Total Views |
चामोर्शी, 
staff reached रोजगारासाठी भटकंती करताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने चामोर्शी तालुक्याच्या एकोडी येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांची दोन्ही चिमुकली पोरकी झाली आणि त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी वृद्ध आजी आजोबांवर येऊन पडली. या बाबीची माहिती मिळताच बाल संरक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी मंगळवारी, 7 मेरोजी थेट एकोडी गाव गाठून जराते कुटुंबातील चिमुकल्यांची भेट घेतली.
 

staff  
 
 
चामोर्शी तालुक्यातील एकोडी येथील संजय बालाजी जराते व शुभांगी संजय जराते हे 15 दिवसांअगोदर एका अपघातात मृत्यू पावल्याने त्यांच्या पश्‍चात लहान दोन मुले आहेत. एक चेतन संजय जराते व यश संजय जराते हे होत. दोन्ही बालके अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या आदेशाअन्वये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचार्‍यांनी सदर अनाथ बालकांच्या घरी भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती दिली.staff reached सदर योजनेचा लाभ देण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही बालकांचे अनाथ प्रमाणपत्र महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मोफतमध्ये काढून दिल्या जाईल. सदर गृहचौकशी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार व नीलेश देशमुख यांनी केली. संजय जराते व शुभांगी जराते यांच्या घरी शेतजमीन नाही. मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.