‘यंदा तरी दगा देऊ नको निसर्ग राजा..!'

बळीराजा रखरखत्या उन्हात शेती मशागतीसाठी

    दिनांक :11-May-2024
Total Views |
शेतकऱ्यांची आर्त हाक : खरीपपूर्व मशागतीची तयारी
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
Ralegaon तालुक्यात उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोचला आहे. भर दुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीणच आहे. दुपारी गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. मात्र शेतीची कामे करावीच लागणार असल्याने जगाचा पोqशदा शेतकरी रखरखते ऊन अंगावर झेलत खरीपपूर्व मशागतीत व्यस्त आहे.
 
 
Ralegaon
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही राळेगाव तालुक्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिलच्या अखेरीस उन्हाचा भडका उडाला आहे. भर उन्हाळ्यात पाऊसही तडाखे देत आहे. तरीही शेतकरी मात्र शेताची मशागत करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. उत्पादन खर्च वाढला त्या तुलनेत उत्पादन होत नाही. त्यातच मालाच्या भावबाजीत मोठी तफावत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. Ralegaon निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचे दिवस संपले आहेत. निसर्ग साथ देत नाही, शासन शेतकèयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांयांना मारक ठरत आहे. तरीही मोठ्या हिमतीने बळीराजा शेती करतो आहे. यंदा दर कोलमडल्याने कवडीमोल भावाने कापूस व सोयाबीन विकावा लागला. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कर्जाचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.
 
उद्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. यंदा उत्पादन कमी आणि दरही कमी अशी अवस्था शेतकèयांची झाली आहे. उत्पादन खर्चही वाढला असून, तुलनेत यंदा शेतीमालाचे दर पडल्याने शेतकèयांच्या पदरी निराशाच आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. परंतु हार न मानता पुन्हा बळीराजा नव्या उमेदीने शेती करायला तयार झाला आहे. गतवर्षी पाऊस उशिरा आल्याने काहींना दुबार पेरणी करावी लागली. तर ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिक खरडून गेले होते. त्यामुळे शेतकèयांचा खरीप हंगाम काहीसा वाया गेला. तर रबी हंगामातही वारंवार आलेल्या पावसाने पिकांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे.