मुलींना संधी द्या : चिन्ता अनुराधा

Chinta Anuradha-Andhra-MP संघर्षात महिलांच्या पाठीशी ठाम

    दिनांक :11-May-2024
Total Views |
नेत्री
 
- शायना एन.सी.
 राजनीतीज्ञ 
 
Chinta Anuradha-Andhra-MP संसदेत नवीन खासदारांच्या शपथविधीचा सोहळा सुरू आहे. आता आंध्र प्रदेशातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या चिन्ता अनुराधा यांच्या नावाचा पुकारा होतो. Chinta Anuradha-Andhra-MP सामान्यत: दक्षिण भारतातील खासदार मातृभाषेतून, इंग्रजीतून, क्वचित संस्कृत भाषेतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतात. त्यामुळे, चिन्ता अनुराधाही असंच करतील, असं सगळ्यांना वाटत असताना, त्या मात्र अस्खलित हिंदीतून शपथग्रहण करतात. Chinta Anuradha-Andhra-MP भारतीय स्त्रीशक्तीची एक नवी ओळख देशापुढे अलगद रुजते. महिला या समाजाच्या स्तंभ आहेत. पण, अजूनही आपला समाज त्यांना समान संधी देण्यात आणि त्यांच्या योगदानाची नोंद घेत नाही. त्यासाठीही महिलांना संघर्ष करावा लागतो. Chinta Anuradha-Andhra-MP अशा प्रत्येक संघर्षात महिलांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहण्याचा निर्धार करून, राजकारणात आल्या चिन्ता अनुराधा !
 
 
 
Chinta Anuradha-Andhra-MP
 
 
 
 
आंध्र प्रदेशातील दक्षिण गोदावरी जिल्ह्यातील लहानसं गाव मातीर! या गावात चिन्ता कृष्णमूर्ती आणि चिन्ता विजयाभारती या दाम्पत्याच्या पोटी चिन्ता अनुराधा यांचा जन्म झाला. Chinta Anuradha-Andhra-MP १८ ऑक्टोबर १९७२ रोजी जन्मलेल्या या मुलीचे वडील समाजसेवक होते. अनुराधाने हैदराबादेतून शालेय आणि उस्मानिया विद्यापीठातून स्नातक शिक्षण घेतलं. सर्वसामान्य युवतींप्रमाणे कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या अनुराधा यांचा २२ नोव्हेंबर १९९१ रोजी पी.एस.एन.मूर्ती यांच्याशी विवाह झाला. ते प्रशासकीय अधिकारी होते. Chinta Anuradha-Andhra-MP अनुराधा यांच्या वडीलांच्या निधनानंतर, राजकारणात येण्याचा पर्याय त्यांच्यापुढे खुला झाला आहे. गरीबीचं प्रमाण जास्त, नारळाच्या शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न, व्यसनांच्या आहारी गेलेली पुरुषमंडळी आणि शिक्षणासारख्या मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे महिलांचा संघर्ष सततचा आहे. Chinta Anuradha-Andhra-MP ही समस्या जाणून त्यांच्यासाठी काम करण्याच्या उद्देशाने अनुराधाने राजकारणात येण्याची ही संधी स्वीकारली.
 
 
 
 
तोपर्यंत त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला होता. पती आणि मुलांच्या पाठींब्याने आंध्र प्रदेशातील अमलापुरम् मतदार संघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या. Chinta Anuradha-Andhra-MP एक सामान्य गृहीणी ते लोकसभेत १५ लाख नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारं नेतृत्त्व हा त्यांचा प्रवास ! शपथविधी हिंदी भाषेतून केला कारण, आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या समुदायाचं प्रतिनिधीत्व करीत आहोत, ही भावना दृढ होती. तिथे संपूर्ण राष्ट्र एक आहे, त्यात भेद नसावा या भावनेतून हिंदी भाषेतून शपथ घेतल्याचं त्या नम्रपणे सांगतात. त्यांच्या मतदारसंघातील बेरोजगारी, शिक्षण आणि रुग्णालयासह मागास वर्गाच्या नागरिकांसाठी आरक्षण देण्याचा मुद्दा त्यांनी संसदेत लावून धरला. Chinta Anuradha-Andhra-MP देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी रेल्वे न पोहचलेल्या त्यांच्या मतदारसंघात रेल्वेची सुविधा सुरू होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात तेलविहीरी आणि त्यावरील प्रक्रीया उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत.
 
 
 
 
 Chinta Anuradha-Andhra-MP या तेल कंपन्यांच्या सहकार्यातून रस्ते, शाळा, रुग्णालय आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या सांगतात. आई, सून, मुलगी म्हणून मिळणारा मान आहेच पण, खासदार म्हणून मिळालेला सन्मान वेगळाच आहे. संसद म्हणजे लोकशाहीचं मंदीर असून, तिथे गेल्यानंतर आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी काम करण्याची जाणीव आणि जबाबदारी निर्माण होते, असं त्या सांगतात. Chinta Anuradha-Andhra-MP पुढे आलेली संधी सोडू नका आणि कायम नवीन शिकत रहा. प्रगतीच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत समाधानी राहू नका, हा संदेश त्या युवकांना देतात. महिला आरक्षणच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यासोबतच महिला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी आर्थिक सहाय्य वाढविण्यासाठी चिन्ता अनुराधा कार्यरत आहेत.
 
स्वैरानुवाद : रेवती जोशी-अंधारे