व्याप्त काश्मिरातील जनता उतरली रस्त्यावर

    दिनांक :11-May-2024
Total Views |
- आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार
 
मुझफ्फराबाद,
People of Occupied Kashmir : व्याप्त काश्मीरमधील जनतेने सरकारविरोधात उठाव केला आहे. मोठ्या संख्येने लोक महागाई, करवाढ व सरकारकडून होणार्‍या अत्याचाराविरोधात एकवटली आहे. शुक‘वारी हजारोंच्या संख्येने येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते. शनिवारी बंदची हाक देत आंदोलन केले. यावेळी सामान्यांचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. यात अनेक नागरिक जखमी झाले आहे.
 
 
Kashmir people
 
People of Occupied Kashmir : जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात व्याप्त काश्मिरातील अनेक भागातील लोक शुक‘वारी एकवटले. शनिवारी बंदची हाक देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन दडपण्यासाठी प‘शासनाने जमावबंदी लागू केली होती. तरीही शनिवारी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. यानंतर मीरपूर जिल्ह्यात पोलिसांसह सुरक्षा दलाने अटक वॉरंटशिवाय 700 पेक्षा अधिक नागरिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर संतापलेल्या जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यानंतर लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला. यात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली.
मुलांवरही केला गोळीबार, लाठीचार्ज
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार व्याप्त काश्मिरात ज्वाईंट अवामी अ‍ॅक्शन कमिटीने लॉन्ग मार्चची घोषणा केली होती. हा मोर्चा रोखण्यासाठी संघटनेच्या नेत्यांना शुक‘वारी रात्री ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर शनिवारी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर प्रशासनाने जमावबंदी लागू करून अतिरिक्त कुमक मागवली. आंदोलन दडपण्यासाठी सुरक्षा दलाने सामान्य नागरिकांसह मुलांवरही अश्रुधुराचा मारा, लाठीचार्ज व गोळीबार केला.
नागरिकांचा संयम का सुटला?
- एक किलो दळणासाठी 800 रुपये मोजावे लागते
- करवाढीमुळे जीवनावश्यक वस्तू आवाक्याबाहेर
- इंधनाचे दर सर्वकालीन उच्चांकावर
- युनायटेड काश्मीर पीपुल्स नॅशनल पार्टीच्या नेत्यांना अटक
- लोकांवर लाठीमार करण्याच्या घटना वाढल्या