विरोधकांना पुरून उरणारा ‘बाप माणूस’

    दिनांक :11-May-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Prime Minister Modi  पहिल्या दोन-तीन टप्प्यांतील मतदानाचा कौल बघता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात भाजपाचा सफाया होत आहे. भाजपा 100 जागांच्या वर जाणार नाही, अशी मोदीविरोधी लाट देशात दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. अशा पद्धतीचं एक वातावरण असल्याचं सगळीकडे सांगण्याचा प्रकार आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते करू लागले आहेत तर देशात इंडिया आघाडीचे नेते करताना दिसत आहेत. असले हे प्रकार आजच केल्या जात आहेत अशातला भाग नाही, तर या निवडणुकीला पकडून मागील चार-पाच निवडणुकांपासून हेच चित्र बघायला मिळाले आहे. सारखा एजेंडा राबविला जातो, सारखं नरेटिव्ह सेट केलं जातं. 2014 लोकसभा, 2017 उत्तरप्रदेश विधानसभा, 2019 लोकसभा, 2022 उत्तरप्रदेश विधानसभा, 2023 पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सारखाच प्रचार विरोधकांनी चालवलेला बघितला. आणि आता, 2024 लोकसभेमध्येदेखील ‘भाजपाचा सफाया, त्यांचा चेहरा उतरला आहे, त्यांची देहबोलीच सांगते. भाजपाची परिस्थिती या निवडणुकीत खराब, भाजपा बॅकफूटवर गेली आहे, पंतप्रधानांची भाषा बदलली, पंतप्रधानांनी आपले मुद्दे बदलले, अजेंडा बदलला, नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि मोदी घाबरलेले आहेत,’ असं तंतोतंत सारखंच पॅटर्न आणि सारखाच प्रपोगंडा चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. स्क्रिप्ट एकच असते. वारंवार तीच ती स्क्रिप्ट वाजविणारे लोकंदेखील तेच आहेत. तेच इको सिस्टिम आहे आणि तेच लेफ्ट लिबरल भाऊबंधू आहेत. जे माध्यमांमध्येही आहेत आणि माध्यमांबाहेरही आहेत. जे हा अजेंडा समाजमाध्यमांवर सेट करताना दिसतात. आणि नेमके दरवेळी निकाल मात्र विपरीत लागतात, हे विरोधकांचं आणि लेफ्ट लिबरलांचं दुर्दैवच म्हणावं लागेल.
 
 
modi prachar

 
सातत्यानं खोटं नरेटिव्ह, खोटा प्रचार, भ्रम पसरवण्याचा एकमेव धंदा दर निवडणुकीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे लोक आणि लिब्रांडू लोक करीत असतात. त्यातून काही थोडाफार तरी लाभ आपल्याला होईल, अशी कदाचित अपेक्षा असावी. मात्र, समाजात किंवा मतदारांमध्ये खोटा प्रचार आणि भ्रम पसरवून लाभ मिळविण्याच्या यांच्या प्रयत्नांवर जनता नेहमी पाणी फेरते. यांना तोंडावर आपटते. पण तरीदेखील किंचितही आचरणात बदल या विरोधी नेत्यांमध्ये आला असेल तर नवल. ‘निर्लज्जम् सदा सुखी’ यापेक्षा दुसरं काहीच लागू होऊ शकत नाही यांच्यासाठी.
 
 
Prime Minister Modi  : पंतप्रधान मोदींना तुम्ही शिव्या देऊ शकता, मोदींची तुम्ही निंदा नालस्ती करू शकता; पण मोदी घाबरले म्हणू शकत नाही. कारण, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मोदींवर मोठमोठे आघात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या यंत्रणेने केले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोदींना त्रास देण्याचा सर्वशक्तिनिशी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तडीपार करण्यात आले. तेव्हादेखील नरेंद्र मोदी घाबरले नाहीत. 1984 नंतर या देशातील जनतेने पूर्ण बहुमत ज्याला मिळाले, तो नेता म्हणजे नरेंद्र मोदी होय. 2014 पासून ज्या पंतप्रधानांचे जनमत सातत्याने वाढत आहे, तो नेता म्हणजे नरेंद्र मोदी होय. जागतिक पातळीवर आपला लोहा सिद्ध करणारा, जगातील विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपतीदेखील आदर करतात, पाया पडतात तो भारताचा एकमेव नेता म्हणजे नरेंद्र मोदी होय. असा जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या यादीतील ‘बाप माणूस’ असलेला आमच्या देशाचा पंतप्रधान असलेला नेता घाबरेल? पुन्हा निवडून येण्याची पूर्ण शाश्वती असताना या टीनपाटांना घाबरतील? असं काही ऐकलं तर हसू आवरेनासे होते. मोदी जीवनातील प्रत्येक निवडणूक आणि लढाई विश्वासानं आणि साहसानं लढत आले आहेत. त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच काम केलं नाही, तर समाजातील विविध समस्यांवरही ते सतत कार्य करीत असतात. मोदींचं एक दृढ नेतृत्व असून देशाप्रती निष्ठा आहे. त्यांनी आपल्या घर-परिवाराचा त्याग करून स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. त्यामुळे त्यांना कोणतीही भीती किंवा दुःख वाटत नाही.
 
 
मोदींनी आपल्या खाजगी जीवनात आणि सार्वजनिक जीवनातही अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. त्यामुळे संघर्ष, आत्मविश्वास कमी झाला नाही. मोदींनी अनेक निवडणुकांमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांच्यात एक स्थिर आणि निष्ठापूर्ण विश्वास असल्याने, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने लोकांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. मोदींचा स्वतःचा अनुभव आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वासच त्यांना आश्चर्यकारक बळ आणि ऊर्जा देते. मोदींना राष्ट्र विकासाचा ध्यास आहे. मोदींचं ‘400 पार’ हे लक्ष्य पूर्ण करणं शासकीय, आर्थिक, सामाजिक, आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाने साध्य आहे. त्यांचं उद्योग, कृषी, उद्याची प्रगती, औद्योगिकीकरण, वित्तीय सुधारणा, शिक्षण, स्वास्थ्य अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीसाठी, सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याने पूर्ण करणं गरजेचं आहे. भारताला उत्तम आणि समृद्ध बनवण्यासाठी राष्ट्रधर्माचं सर्वांत मोठं दायित्व त्यांच्यावर आहे. त्यासाठीचे प्रयत्न ते कोणत्याही क्षणी थांबवणार नाहीत. लाथ मारेल तेथे पाणी काढण्याची क्षमता असणारे मोदी केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यात ‘कमळ’ फुलवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. 73 वर्षांचे मोदी एका दिवसात देश पिंजून काढत असून तास-तासभर भाषण देत आहेत. अशा परिस्थितीत चेहर्‍यावर जर थकवा जाणवत असेल तर त्याला तुम्ही ‘डर’ म्हणत असाल, तर तुमच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे.
 
 
Prime Minister Modi  : मोदी हे एक असं रसायन आहे, जे निवडणुकांचं काय, दुसरा कुठला लढादेखील असेल तर ते घाबरणार्‍यातले नाहीत. त्यांचं स्थिर आणि निष्ठापूर्ण नेतृत्व, अद्भुत विचारधारा आणि कामातील प्रामाणिक उत्कृष्टता हे सर्व अकल्पनीय आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊतसारख्या गल्लीतल्या टीनपाट नेत्यांनी मोदींविषयी गरळ ओकणं हेच मुळात सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. नरेंद्र मोदी अशा लोकांना तर भीकदेखील घालत नाहीत. अशा दोन-कवडीच्या लोकांना तर येथे महाराष्ट्रात मोदींचे चेले देवेंद्र फडणवीस एकटेच निपटवतात. असे देशपातळीवर अमित शाह, योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्व शर्मासारखे अनेक सेनापती आहेत मोदींचे, जे टुकार नेत्यांना चुटकीत निपटवतात. त्यामुळे मोदी पराभवाच्या भीतीने घाबरले म्हणणारेच, 4 जून रोजी हरले, तर त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली पाहिजे. 
 
- 9270333886