प्रेयसीसाठी पत्नीची अश्लील चित्रफीत बनवून केली प्रसारित

11 May 2024 19:21:36
अकोला,
love case Akola : प्रेयसीसाठी पत्नीने घरातून निघून जावे व आपल्याला सोडावे या भावनेने विकृत बनलेल्या पतीने स्वत:च्या पत्नीची अश्लील चित्रफीत बनवून ती एका मदतगाराच्या सहाय्याने प्रसारित केली. जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पो. स्टे. हद्दीत हा प्रकार घडला असून पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी तिचा षड्यंत्रकारी पती आणि त्याचा मित्र मुस्तकीन शेख यासीन शेख याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुस्तकीनला पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
patur
 
प्रेयसीला जवळ करण्यासाठी पत्नीला आयुष्यातून दूर करण्याचा डाव या पतीने रचला. त्यासाठी त्याने मित्राच्या मदतीनं स्वत:च्या पत्नीची अश्लील चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमावर प्रसारित केली. इतकेच नव्हे तर, त्याने ती चित्रफीत नातेवाईकांनाही पाठवली. हा भयंकर प्रकार चान्नी पोलिस स्टेशन हद्दीत घडला.
 
 
ही बाब उघड झाल्यावर आणि पीडित विवाहितेने तक्रार दिल्यावर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवर्‍यासह त्याचा मित्र मुस्तकीन शेख यासीन शेख याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत व अधिक तपास चान्नी पोलिस करीत आहेत. याप्रकरणी मुस्तकीनला अटक करण्यात आली आहे.
 
 
चान्नी पो. स्टे. हद्दीतील एका गावात दोघे पती-पत्नी अनेक दिवसांपासून राहत होते. या दरम्यान त्या पतीच्या भ्रमणध्वनीवर दुसर्‍या एका युवतीचे सतत फोन यायला लागले. त्यावरून या पती-पत्नीत वाद सुरू झाले. हे वाद पुढे इतके वाढले की आता पत्नीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी संबंधित पतीने भयंकर षड्यंत्र रचले आणि त्याने पत्नीचीच अश्लील चित्रफीत बनवून ती समाज माध्यमावर टाकून तिची बदनामी चालविली.
 
 
इतकेच नव्हे तर जानेवारी 2024 मध्ये पीडित विवाहितेस पतीचा मित्र मुस्तकीन शेख याने धमकी दिली होती. त्याने काही अंघोळ करताना आणि इतर अश्लील बनावट व्हिडीओ तयार केले होते. व त्या आधारे धमकी देत तो पीडित महिलेस शरीर सुखाची मागणी करत होता. पीडित महिलेनं या गोष्टींना स्पष्ट नकार दिला असे तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
 
विशेष म्हणजे या मुस्तकीनने थेट तिच्या नवर्‍यालाच ते व्हिडिओ पाठवले. नंतर पतीने तिला अमानुषपणे मारहाण केली व घराबाहेर काढून दिलं, असंही तक्रारीत नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0