बीएमडब्ल्यूची आय 5 भारतात सादर

    दिनांक :12-May-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
भारतात पहिली BMW i5 launched बीएमडब्ल्यू आय 5 सादर करण्यात आली आहे. जे विशेष बीएमडब्ल्यू एम परफॉर्मन्स मॉडेल बीएमडब्ल्यू आय 5 च्या रूपात उपलब्ध असेल. ही ऑल-इलेक्ट्रिक स्पोर्टी एक्झिक्युटिव्ह सेडान कार तिच्या आकर्षक रूप, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि गतिमान कामगिरीसह आघाडीवर आहे. पहिली-वहिली बीएमडब्ल्यू आय 5 एम 60 ड्राईव्ह आजपासून संपूर्णपणे बिल्ट-अप म्हणून भारतातील सर्व बीएमडब्ल्यू डीलरशिपवर उपलब्ध आहे.
 
 
pic_2
 
BMW i5 launched : बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक‘म पावाह म्हणाले की, पहिल्यांदा बीएमडब्ल्यू आय 5 कार चालवण्याचा रोमांचकारी अनुभव देते. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाकडून सहावी इलेक्ट्रिक कार भारतीय लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये मजबुतीने उभी राहील. या कारची एक्स शो-रूम किंमत 1,19,50,000 रुपये आहे. आधुनिक युगाच्या उत्साहाची व्या‘या करणार्‍या बिनधास्त कामगिरीसह हा एक अतुलनीय थि‘लसाठी तयार केलेला अनुभव आहे.
 
 
BMW i5 launched : बीएमडब्ल्यू आय 5 मध्ये 81.2 किलो व्हॅटचा बॅटरी पॅक आहे. ही कार सिंगल चार्जिंगमध्ये 516 किलोमीटरची रेंज देते. या कारमध्ये इलेक्ट्रिक ऑल व्हील ड्राईव्ह प्रणालीसह ड्युअल मोटर लेआऊट बसवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक अधिकृत बीएमडब्ल्यू डीलरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.