नेपाळी गिर्यारोहक कामी रीता शेरपा 29व्यांदा एव्हरेस्टवर

    दिनांक :12-May-2024
Total Views |
- चढाईचा स्वतःचाच विक्रम मोडला
 
काठमांडू, 
नेपाळचे प्रसिद्ध Mountaineer Kami Rita Sherpa गिर्यारोहक कामी रीता शेरपा यांनी रविवारी 29व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर सर करून माऊंट एव्हरेस्टच्या सर्वाधिक चढाईचा विक‘म मोडीत काढला. पर्यटन आणि नागरी उड्डयन मंत्रालयातील पर्यटन विभागाचे संचालक राकेश गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय अनुभवी गिर्यारोहक कामी रीता शेरपा यांनी रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.25 वाजता 8,849 मीटर उंचीचे शिखर गाठले. ही मोहीम सेव्हन समिट ट्रॅक्सने आयोजित केली होती आणि त्यात 20 गिर्यारोहक होते. त्यांनी रविवारी सकाळी एव्हरेस्ट सर केला, असे सेव्हन समिट ट्रॅक्सचे वरिष्ठ कर्मचारी थानी गुरागेन यांनी सांगितले.
 
 
Mountaineer Kami Rita Sherpa
 
कामीसह सेव्हन समिट ट्रॅक्समधील किमान 20 गिर्यारोहकांनी रविवारी सकाळी Mountaineer Kami Rita Sherpa माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली, असे सेव्हन समिट ट्रॅक्सने निवेदनात म्हटले आहे. गिर्यारोहक सदस्यांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि कझाकस्तानसह नेपाळमधील तेरा गिर्यारोहकांचा समावेश होता. कामीने 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. गेल्या वर्षी त्यांनी एकाच मोसमात 27व्या आणि 28व्यांदा एव्हरेस्ट सर करण्याचे दोन यशस्वी प्रयत्न केले. अशा प्रकारे, त्यांनी सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर केला. गेल्या वर्षी सोलुखुंबूच्या पासंद दावा शेरपा यांनी एव्हरेस्टचे 27 वे शिखर पूर्ण केले, परंतु या हंगामात चढाईचा प्रयत्न करण्याबाबत तो अनिश्चित आहे.
कामीचा जीवन प्रवास
कामी रीता शेरपाचा जन्म 17 जानेवारी 1970 मध्ये झाला. ते सेव्हन समिट ट्रॅक्समधील वरिष्ठ पर्वतीय मार्गदर्शक आहेत. 1992 मध्ये ते एव्हरेस्टच्या मोहिमेत सहायक कर्मचारी म्हणून सहभागी झाले, तेव्हापासून त्यांचा पर्वतारोहणाचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून कामीने धाडसाने अनेक मोहिमा पूर्ण केल्या.