मानेवाडा भागात रात्री विद्युतप्रवाह खंडित...

    दिनांक :12-May-2024
Total Views |
नागपूर,
Manewada शहरात दिवसागणिक तापमान वाढते आहे. मानेवाडा भागातील बेसा रोडवरील अनेक नगरांमध्ये रात्री बेरात्री अघोषित विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
 
shri 
मागील अनेक दिवसांपासून मानेवाडा - बेसा भागात केंव्हाही ३ते ४ तास विद्युत खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक विद्युत खंडित झाल्यामुळे लहान मुले व वृध्द मंडळींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाऊस व वादळ सुरू असताना विद्युत खंडित होणे समजू शकते मात्र रात्री गाढ झोपेत Manewadaअसताना महावितरणतर्फे विद्युतप्रवाह खंडित होत असल्यामुळे लहान बाळांचे हाल होत आहेत. विद्युत खंडित करण्यापूर्वी भ्रमणध्वनी वर संदेश प्रसारित केल्यास नागरिक सतर्क राहतील. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्युतप्रवाह खंडित करताना किमान रात्रीच्या वेळी विद्युत खंडित करू नये अशी मागणी मानेवाडा व श्रीहरी नगर भागातील नागरिकांनी केली आहे.
सौजन्य डॉ. सोहन चवरे,संपर्क मित्र