साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :12-May-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
saptahik rashi bhavishya
 
मेष (Aries): आरोग्याची काळजी घ्या
Weekly Horoscope : सध्या राशिस्वामी मंगळ राहूसोबत असल्याने तो व्यथित आहे. हा योग पाहता या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खाण्या-पिण्याच्या सवयी, पथ्यपाणी सांभाळले पाहिजे. जुन्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपला औषधोपचार नियमितपणे सुरू ठेवला पाहिजे. शरीरात कोणतीही तक्रार जाणवल्यास वेळीच डॉक्टरांना भेटून उपाय योजले पाहिजेत. काही मंडळींना छोट्या-मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यावर वाहने सांभाळून चालवली पाहिजेत. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे.  केकेआर ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम
शुभ दिनांक - 12, 14, 16, 18.
 
 
वृषभ (Taurus): कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल
राशिस्वामी शुक्राला आता आपल्याच राशीत आलेल्या गुरूची साथ मिळाली आहे. ते दोघेही उत्तम स्थितीत आहेत. ही स्थिती नोकरी-व्यवसायात महत्त्व वाढविण्यास, आपली प्रतिमा उजळण्यासाठी अतिशय पोषक आहे. या आठवड्याचा पूर्वार्ध उत्तम राहील. उत्तरार्धात मात्र काहींना शारीरिक, मानसिक त्रास संभवतो. जरा तंगीचे, अडचणीचे व असमाधानाचे वातावरण राहू शकते. अधिकारी वर्ग नाखूश तर सहकारी वर्ग आडमुठेपणाचे धोरण राबवीत असल्याचा, असहकार्याची भूमिका घेऊन वागत असल्याचा अनुभव येऊ शकतो. काही मंडळींना आरोग्याच्या पातळीवर काळजी घ्यावी लागू शकते.
शुभ दिनांक - 12, 13, 14, 15.
 
 
मिथुन (Gemini): कार्यक्षेत्राचा विस्तार होणार
Weekly Horoscope : या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती पाहता आतापर्यंत काहीसे आकुंचित झालेले आपले कार्यक्षेत्र विस्तारावयास सुरुवात होईल असे दिसते. आपल्या नोकरी-व्यवसायातील अडचणींचा काळ आता समाप्त होऊन काहीशा भरभराटीस सुरुवात होताना दिसेल. आर्थिक कामे होऊन योग्य घडी बसेल. तथापि, काही मंडळींना उत्तरार्ध मानसिक त्रास, चिंता, ऐनवेळेवरची धावपळ-दगदग करावयास लावणारा असला, तरी सरतेशेवटी मिळणारे यश आपणास पुरेसे समाधान देणारे राहील. काही मंडळींना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ दिनांक - 12, 14, 15, 18.
 
 
कर्क (Cancer): अनावश्यक खर्चाला आवर घाला
हा आठवडा आपणास प्रामुख्याने खर्चवाढ दर्शविणारा ठरावा. वाढीव खर्चाची अनेक कारणे आपल्या समोर एका पाठोपाठ एक अशी उभी होत राहतील. हाती येणारे पैसे हे खर्चासाठीच मिळत आहेत की काय असे जाणवेल. उत्साहाच्या भरात केलेली अनावश्यक खरेदी, पार्ट्या, प्रवास, सिनेमा-नाटकादिकातील चंगळ असे सारे काही या सप्ताहात घडू शकते. पण या सार्‍यातून आपणास आनंद मिळणार, हे खरे असले तरी सरते शेवटी रिकामा होत असलेला खिसा पाहून मन खट्टू झाले नाही म्हणजे मिळविले. या सार्‍यात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. विशेषतः हवामानातील बदलामुळे त्रास जाणवेल.
शुभ दिनांक - 13, 14, 15, 16
 
 
सिंह (Leo): कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती
या सप्ताहाच्या सुरुवातीलाच राशिस्वामी रवी दशम या कर्मस्थानात स्वतःच्या नक्षत्रात विराजमान झाला आहे. त्यामुळे त्याचे या सप्ताहातील भ्रमणच आपणास अतिशय लाभदायक आणि उत्साहवर्धक व कार्यक्षेत्रात प्रगतीचे ठरू शकणार आहे. नवीन खरेदी, मोठ्या कार्यासाठी केलेली गुंतवणूक अशा घटना घडल्यास आश्चर्य वाटावयास नको. नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहून अधिकारी वर्गात वट निर्माण होईल. हाताखालचा सहकारी वर्ग आनंदी राहून आपल्या वाटचालीत मदतगार ठरेल. सरकारी नोकरीत असणार्‍यांना त्यांच्या कार्याचे चीज होताना दिसेल.
शुभ दिनांक - 12, 15, 16, 17.
 
 
कन्या (Virgo): शारीरिक-मानसिक त्रागा
Weekly Horoscope : या आठवड्यात आपल्या मागची दगदग-धावपळ- मानसिक ताणतणावाचे वातावरण, अथक मेहनत संपावयाची नाही असे दिसते. अशारीतीने शारीरिक-मानसिक त्रागा होत असताना खर्चदेखील वाढलेला असणार. काहीशा विस्कळीत झालेल्या अंदाजपत्रकामुळे आपले मन खट्टू होऊ शकेल. पण तूर्त येणार्‍या प्रसंगाला सामोरे जाणे क्रमप्राप्त आहे. या सार्‍या परिस्थितीतून आपण लवकरच बाहेर पडणार आहात हेही खरे. घेतलेल्या या मेहनतीचे, परिश्रमाचे चांगले बक्षीस पदरी पडणार आहे. आपली आर्थिक प्रगती होईल, पुन्हा घडी बसेल.
शुभ दिनांक - 12, 14, 17, 18.
 
 
तूळ (Libra): उत्साहपूर्ण वाटचाल सुरू
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राने आपल्या लाभस्थानातून साधलेला शुभयोग पाहता हा सप्ताह आपणास अतिशय उत्तम, धनवर्धक, सामाजिक आणि वैयक्तिकद़ृष्ट्या उत्तम योग देणारा ठरावा. विशेषतः व्यावसायिकांची आर्थिक आवक वाढेल. कुटुंबाचे आणि हाताखालच्या सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य मिळेल. काही चांगल्या कामात आणि सामाजिक कार्यात आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविता येईल. या सार्‍याचा उत्तम लाभ आपले मनोबल वाढण्यात होणार. त्यामुळे उत्साहपूर्ण वातावरणात आपणास सारी पुढची वाटचाल करता येईल.
शुभ दिनांक - 13, 14, 15, 16.
 
 
वृश्चिक (Scorpio): व्यवसायात अपेक्षित पल्ला
Weekly Horoscope : या सप्ताहारंभी राशिस्वामी मंगळ उत्तम स्थितीत असून गुरूची शुभदृष्टी लाभलेली आहे, हा सप्तााह आपणास संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. त्यातही सप्ताहाच्या पूर्वार्धाचा काळ सुखावह व प्रगतिकारक ठरावा. आपल्या आशा-आकांक्षांची पूर्तता होईल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित पल्ला गाठता येईल. आपली कामे सहजी पूर्णत्वास गेल्याने एकप्रकारचे मानसिक समाधान मिळेल. कार्यक्षेत्राचा, व्यवसायाचा विस्तार करता येईल. त्यात अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्‍यांची योग्य मदत मिळून प्रगतीकडे वाटचाल करता येईल. सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र काहीसा क्लेशकारक राहण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक - 12, 13, 14, 15.
 
 
धनु (Sagittarius): वेळकाढूपणा त्यागला पाहिजे
या सप्ताहाच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपल्या सर्वप्रकारच्या प्रयत्नांना, योजनांना, अपेक्षांना अतिशय उत्तम बळ लाभलेले दिसते. आतापर्यंत घेतलेली मेहनत, केलेली प्रतीक्षा फलद्रूप होऊन उत्तम समाधान पदरी पडावे अशी स्थिती सध्या आहे. नुकतेच झालेल्या राशिस्वामी गुरूच्या राश्यंतरानंतर कार्यक्षेत्रातील स्थितीत सुधारणा होऊ शकेल. आपले उद्दिष्ट गाठण्यास या सप्ताहात यश मिळू शकेल. हाती आलेली संधी दुर्लक्षित केली, वेळ निघून गेली तर मनस्तापाशिवाय काहीच पदरी पडणार नाही.
शुभ दिनांक - 12, 16, 17, 18.
 
 
मकर (Capricorn): आर्थिक प्रगतीची सुचिन्हे
Weekly Horoscope : राशिस्वामी शनीने धनस्थानात मांड ठोकलेली असून तो सध्या उत्तम स्थितीत असल्याने या आठवड्यात आपली आर्थिक प्रगती होण्याची सुचिन्हे दिसत आहेत. विशेषतः व्यवसायाच्या क्षेत्रात असणार्‍या मंडळींची आर्थिक आवक वाढण्याची संभावना आहे. तसे या सप्ताहात खर्चाला अनेक वाटा फुटलेल्या दिसतील. तो आवरण्याचा प्रयत्न करावा. काहींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. विशेषतः पोटाचे त्रास संभवतात. अनारोग्याचा आपल्या नोकरी-व्यवसायावर काहीसा परिणाम होऊ शकतो. उत्तरार्धात काहीशी व्यावसायिक पीछेहाट होत असल्याचा अनुभव येऊ शकतो.
शुभ दिनांक - 13, 15, 16, 17.
 
 
 
कुंभ (Aquarius): बहुविध प्रगतीस पोषक
राशिस्वामी शनीचे सध्या राशिस्थानातून सुरू असलेले भ्रमण आपणास अतिशय सुखावह आहे. त्याच्या राशीतील या उपस्थितीमुळे आर्थिकसह विविध क्षेत्रात उत्तम योगांना चांगले बळ मिळू शकते. काही मंडळींना काहीसे अचानक व अनपेक्षित यश मिळू शकते. विशेषतः या आठवड्यात आपण व्यावसायिक स्वरूपाचे जे ही काही निर्णय घ्याल त्यातून उत्तम आर्थिक लाभ व्हावा. व्यवसायाचा विस्तार करता येईल. नोकरीत असणार्‍यांना पदोन्नती, आर्थिक लाभ, मोठ्या कंपनीसाठी बदल, पगारवाढ असे योग संभवतात. एकूणच हा सप्ताह प्रगतीसाठी उत्तम ठरावा.
शुभ दिनांक - 12, 14, 16, 18.
 
  
मीन (Pisces): प्रगतीची वाट सुकर होणार
Weekly Horoscope : राशिस्वामी गुरू नुकताच पराक्रमात आलेला असल्याने सध्याचा काळ आपणास एकूणच उत्तम ठरणार आहे. भाग्योदय, कार्यक्षेत्रातील प्रगती, सामाजिक व धार्मिक कार्यात यश देणारा हा काळ असेल. या सप्ताहात आपली आर्थिक कामे अवश्य घडून येतील. त्यासाठी भरपूर मेहनत, काहीसा संघर्षही करावा लागत असल्याचा अनुभवही येत राहणार. पण प्रगतीची वाट सावकाश का होईना आता सुकर होऊ लागेल, याचा विश्वास ठेवा. काही मंडळींना आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे प्राथमिकतेने लक्ष देण्याची अतिशय गरज आहे.
शुभ दिनांक - 12, 13, 16, 17.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746