खतांचा काळाबाजार रोखणार

fertilizer-Wardha-DAP खतांचे दर जैसे थे, बियाण्याची दरवाढ

    दिनांक :12-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
वर्धा,
 
 
fertilizer-Wardha-DAP जिल्ह्यात 1 जूनपासून खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी आता साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. fertilizer-Wardha-DAP मात्र, याच काळात बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून तालुकास्तरावर तक्रार निवारण समित्या गठित केल्या असून अक्षय तृतीयेच्या दिवशी बियाणे कृषी केंद्रावर पोहोचले आहे. fertilizer-Wardha-DAP यावर्षी खताच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून कपाशीच्या पिशवीची एमआरपी 8 रुपयांनी वाढली आहे.
 
 

fertilizer-Wardha-DAP 
 
 
जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता 2 लाख 34 हजार 24 हेक्टर क्षेत्रात पेरणीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात कापूस 2 लाख 24 हजार 650 हेक्टर, सोयाबीन 1 लाख 35 हजार 850 हेक्टर आणि 65 हजार 500 हेक्टरमध्ये तुरीसह ज्वारी, मका, तीळ, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांचा समावेश आहे. fertilizer-Wardha-DAP यंदाच्या हंगामात सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे पुढील महिन्यापासूनच जिल्ह्यातील कृषी विभाग सक्रीय होणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे बियाणे, खते आणि कीटकनाशकांची तपासणी वेळेवर पुरवठा आणि गुणनियंत्रणाची जबाबदारी आहे. तर खरीप हंगामाच्या पेरणीची जबाबारी कृषी विभागाकडे आहे.fertilizer-Wardha-DAP
 
 
 
fertilizer-Wardha-DAP सध्या शेतकरी उन्हाळवाहीची कामे करण्यात व्यस्त आहे. गेल्या खरीप हंगामात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले होते. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यात खताचा साठा कमी दाखवून विक्रेते शेतकर्‍यांना बियाणे खरेदीसाठी वेठीस धरत असल्याचे पुढे आले होते. fertilizer-Wardha-DAP 15 मे नंतर शेतकर्‍यांना कपाशी बियाणे उपलब्ध होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक शेतकर्‍यांनी बियाण्यांचे बुकिंग सुरू केले आहे. खतांचे दर गतवर्षीप्रमाणेच आहेत. कापूस बियाण्याच्या पिशव्यांच्या एमआरपीमध्ये किंचित वाढ झाली आहे. शेतकरी जास्त डीएपी आणि 10,26, 26 खतांचा वापर करतात. कारण त्यात 3 नत्र अधिक आहेत. जिल्ह्यात सध्या खतांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्या तुलनेत यंदा जिल्ह्यात या दोन्ही खतांचा पुरवठा कमी होत आहे.fertilizer-Wardha-DAP