पूर्वार्ध सरला, उत्तरार्ध सुरू!

AAP-Arvind Kejriwal राजधानी दिल्लीत नवी युती !

    दिनांक :13-May-2024
Total Views |
दिल्ली दिनांक 
 
 
- रवींद्र दाणी
 
 
AAP-Arvind Kejriwal ५४३ खासदार निवडण्यासाठी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा पूर्वार्ध सरला असून उत्तरार्ध आज सुरू होत आहे. पहिल्या तीन  फेऱ्यांमध्ये २८५ मतदारसंघांतील मतदान आटोपले. AAP-Arvind Kejriwal २५८ मतदारसंघांतील मतदान बाकी आहे आणि यातील ९६ मतदारसंघांचा चौथा टप्पा आज होत आहे. म्हणजे आज मतदान होणारे मतदारसंघ हिशेबात घेता एकूण ७० टक्के मतदारसंघातील मतदान आटोपलेले असेल.AAP-Arvind Kejriwal
 

AAP-Arvind Kejriwal
 
 
AAP-Arvind Kejriwal चौथी फेरी : चौथ्या फेरीत एकूण ९६ मतदारसंघात मतदान होणार असून यात आंध्र प्रदेश २५ तर तेलंगणा १७ अशा एकूण ४२ मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश या राज्यांमधील काही मतदारसंघांतही या फेरीत मतदान होत आहे. आंधप्रदेश विधानसभेसाठी या फेरीत मतदान होत असून राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना सत्ता गमवावी लागेल, अशी चिन्हे आहेत. याचा थेट फायदा तेलगू देसम् चे नेते चंद्राबाबू नायडू यांना मिळण्याची शक्यता आहे तर लोकसभेत भाजपाला या राज्यात बèयापैकी जागा मिळण्याची चिन्हे आहेत.
 
 
AAP-Arvind Kejriwal पाचवी फेरी : पाचव्या फेरीत २० मे रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत मतदान होईल. या फेरीने महाराष्ट्रातील मतदान पूर्ण होईल. याच फेरीत उत्तरप्रदेशातील १३ मतदारसंघांत मतदान होईल. यात काँग्रेस व भाजपा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अमेठी-रायबरेली या मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय हमीरपूर, बांदा, गोंडा, फत्तेपूर, बाराबंकी, फैजाबाद, झांसी या मतदारसंघांतही मतदान पूर्ण होईल. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ मतदारसंघात या फेरीत मतदान होत असून भाजपा नेते राजनाथसिंग येथून निवडणूक लढवीत आहेत.
 
 
AAP-Arvind Kejriwal राजधानी दिल्लीत! : २५ मे रोजी होणाऱ्या सहाव्या फेरीत राजधानी दिल्लीत मतदान होईल. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यावेळी भाजपाने ७ पैकी ६ उमेदवार बदलले आहेत. यातील डॉ. हर्षवर्धन, रमेश बिधुरी व माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे सुपुत्र परवेश वर्मा यांचा समावेश आहे. हे तिन्ही उमेदवार दिग्गज मानले जातात. चांदणी चौक मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले डॉ. हर्षवर्धन यांची प्रतिमा चांगली आहे. आता त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करली असून आपल्या वैद्यकीय सेवेकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हर्षवर्धन हे बनिया समाजाचे आहेत. त्यांच्या उमेदवारीचा भाजपाला फायदाच झाला असता. जाट समाजात परवेश वर्मा यांना सन्मान आहे आणि दक्षिण दिल्लीतून निवडून येणारे रमेश बिधुरी हे एक दबंग नेते मानले जातात. त्यांनीही आपल्या मतदारसंघात भरपूर कामे केली आहेत. या तिघांनाही फेरउमेदवारी अपेक्षित होती. त्यांना उमेदवारी मिळाली असती तर तिघेही चांगल्या मताधिक्याने निवडून आले असते.
 
 
AAP-Arvind Kejriwal नवी युती : दिल्लीतील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडे दुर्लक्ष केले आहे. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. याचा विचार करूनच केजरीवाल यांनी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस व आम आदमी पक्ष यांनी जागावाटप केले असून आम आदमी पक्ष चार मतदारसंघांत तर काँग्रेस तीन मतदारसंघांत निवडणूक लढवीत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाचे मताधिक्य एवढे मोठे होते की ते पार करून भाजपाला मात देणे काँग्रेस व आम आदमी पक्ष यांच्यासाठी एवढे सोपे नाही. पण, ही युती काही मतदारसंघात भाजपाला आव्हान निश्चितच देऊ शकते. काँग्रेस व आम आदमी पक्ष यांच्यात युती झाली असली, तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती झालेली नाही. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांचा राजीनामा याचे द्योतक आहे. त्यामुळे ही युती किती परिणामकारक ठरेल यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
 
 
AAP-Arvind Kejriwal केजरीवाल यांना जामीन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांची जमानत दिली. केजरीवाल यांना जमानत मिळाल्याने ते प्रचारात सहभागी होऊ शकतात. त्यांच्या प्रचाराचा दिल्लीत परिणाम होईल काय, याची चर्चा केली जात आहे. दिल्लीव्यतिरिक्त आम आदमी पक्षाचे अस्तित्व पंजाबात आहे. पंजाबमधील निवडणूक १ जून रोजी आहे. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यास त्यांच्या प्रचाराचा फायदा आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये निश्चित मिळेल, असे मानले जाते. दिल्ली व पंजाबमधील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच केजरीवाल यांनी जामिनासाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. अखेर त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला. मात्र, या काळात त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करता येणार नाही वा कोणत्याही फाईलींवर सहीही करता येणार नाही.
 \
AAP-Arvind Kejriwal योग्य निर्णय : केजरीवाल यांच्या अटकेवर देशात व विदेशातही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. देशात लोकसभेची निवडणूक होत असताना, केजरीवाल यांना प्रचार करण्यापासून वंचित करण्यात येत आहे, असा एक संदेश सर्वत्र जात होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने त्याला पूर्णविराम मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचा योग्य संदेश केवळ देशातच नाही तर विदेशातही जाणार आहे. ‘एक योग्य निर्णय' या शब्दात न्यायालयाच्या आजच्या आदेशाचे वर्णन करता येईल.
AAP-Arvind Kejriwal शेवटची फेरी : देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा वाराणसी मतदारसंघात शेवटच्या फेरीत म्हणजे १ जून रोजी मतदान होणार आहे. दक्षिण वाराणसी, उत्तर वाराणसी, छावनी, सेवापुरी, रोहानिया असे पाच विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात १९ लाखांवर मतदार आहेत. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी चांगल्या मताधिक्याने ही जागा जिंकली आहे. तेथे त्यांना पुन्हा एक चांगला विजय मिळण्यात अडचण येऊ नये, अशी आजची स्थिती आहे. वाराणसीसोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्येही शेवटच्या फेरीत मतदान होईल. कुशीनगर, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सालेमपूर, गाझीपूर, घोसी, चंदौली, बलिया व रॉबर्टसगंज या मतदारसंघांतही शेवटच्या फेरीत मतदान होणार आहे.
 
 
AAP-Arvind Kejriwal हिमाचल-पंजाब : उत्तरप्रदेशाव्यतिरिक्त आणखी दोन राज्यांत या एका दिवशी मतदान होणार आहे. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या हिमाचल प्रदेशातील सर्व चारही मतदारसंघांत १ जूनला मतदान होईल. चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतच्या उमदेवारीमुळे मंडी मतदारसंघातील लढत चुरशीची होत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही हिमाचलातून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. राज्यातील काँग्रेस सरकार आपल्या काही आमदारांच्या पक्षबदलामुळे अस्थिर आहे. लोकसभा निवडणुकीत होणारे मतदान काँगे्रस सरकारचेही भवितव्य ठरविणार आहे. पंजाबमधील सर्व १३ मतदारसंघांत या शेवटच्या फेरीत मतदान होईल. राज्यातील लढत यावेळी चौरंगी होत आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस, अकाली दल व भाजपा हे चार पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत. आजवर भाजपा अकाली दलासोबत युती करीत होता. यावेळी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर या मतदारसंघांत भाजपाला विजयाची चांगली संधी असल्याचे मानले जाते. याशिवाय बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांतील उर्वरित मतदारसंघांत या शेवटच्या टप्प्यात मतदान होईल.