ईव्हीएममध्ये बिघाड; मतदारांचा हिरमोड

    दिनांक :13-May-2024
Total Views |
- छ. संभाजीनगर, पुणे, शिरूर, जालना जिल्ह्यात खोळंबा
 
मुंबई, 
EVM off : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यावेळी छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरूर, जालना येथील 25 पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना समोर आल्या. चार तासांपर्यंत मतदार रांगेत ताटकळत उभे होते. यावेळी उमेदवारांसह मतदारांनी गोंधळ घातला होता. ईव्हीएमची दुरुस्ती करण्यास विलंब झाल्याने अनेक मतदार मतदान न करताच परतले. यासंदर्भात मतदारांनी समाज माध्यमांवर पोस्ट करीत निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली.
 
 
EVM off
 
जालन्याच्या अंबड तालुक्यातील आलमगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएममध्ये बिघाड झाला. दोन तासांनी यंत्र दुरुस्त करण्यात आले. तर, भोकरदन शहरातील एका मतदान केंद्रावर दोन व्हीव्हीपॅट बंद पडली. त्यामुळे या केंद्रातील मतदान प्रकि‘या अडीस तासापर्यंत थांबविण्यात आली होती. याशिवाय पैठण येथील एका मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटसह ईव्हीएमचा संच बदलण्याची वेळ आली. अंबड तालुक्यातील अमलगाव, भोकरदन शहरातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले. तीन तासानंतर नवीन यंत्राची व्यवस्था करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरात मतदार आक्रमक
EVM off : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील पंचायत समिती मतदान केंद्र क‘मांकावर सकाळी 7 ते 11 या दरम्यान चार वेळा ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार घडला. नागरिकांनी रोष व्यक्त करीत आयोगाच्या विरोधात घोषणा दिल्याने तणावाची परिस्थिती उद्भवली.

शिरूरमध्ये नागरिकांचा संयम सुटला
शिरूरमधील सहा जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर EVM off ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदार तीन तासपर्यंत रांगेत उभे होते. यावेळी अनेक मतदार मतदान न करताच माघारी परतले. सकाळी 7.30 वाजतापासून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतर दहाच्या सुमारास दुरुस्ती करण्यात आली. बहुतांश मतदार मशिनची दुरुस्ती होईपर्यंत रांगेत उभे होते. पुणे येथील पाच मतदान केंद्रावर हाच प्रकार समोर आला होता.