भूकंपाने मेक्सिको-ग्वाटेमाला हादरला

    दिनांक :13-May-2024
Total Views |
मेक्सिको,
Earthquake shakes Mexico मेक्सिको आणि ग्वाटेमालाच्या सीमेजवळभूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेचा हवाला देत हे 6.4 तीव्रतेचे धक्के जाणवताच लोक भयभीत झाले. एका वृत्तसंस्थेने सांगितले की, हा भूकंप जमिनीच्या 47 मैल (75 किमी) खाली होता. मात्र, चांगली बाब म्हणजे या धक्क्यांमुळे सध्या कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मेक्सिकोच्या नॅशनल सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने सोशल मीडियावर सांगितले की ते भूकंपाशी संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु सुरुवातीला कोणत्याही नुकसानीची माहिती मिळालेली नाही.
 
 
earg
दरम्यान, ग्वाटेमालाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मेक्सिकोच्या सीमेवर असलेल्या क्वेत्झाल्टेनांगो आणि सॅन मार्कोसमध्ये काही इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त फेटाळून लावले, Earthquake shakes Mexico ज्यामुळे रस्ता अडवला गेला होता. न्यूज एजन्सी असोसिएट प्रेस (एपी) ने यूएस त्सुनामी चेतावणी प्रणाली आणि मेक्सिकोच्या नौदलाच्या हवाल्याने म्हटले आहे की सध्या कोणत्याही सुनामीचा धोका नाही.