मला 'भिडू' म्हणू नका....न्यायालयात पोहचला जॅकी

    दिनांक :14-May-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Don't call me bhiddu अभिनेता जॅकी श्रॉफने त्याच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या संमतीशिवाय त्याचे नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' हा शब्द वापरणाऱ्या विविध घटकांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक फायद्यासाठी वापरणाऱ्या संस्थांविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालय लवकरच निकाल देईल, जेणेकरून अभिनेत्याचे प्रसिद्धी हक्क सुरक्षित राहतील अशी अपेक्षा आहे. या प्रकरणाची उद्या 14 मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
 
kackia
 
बॉलीवूडमधील अभिनेत्याने प्रायव्हसी आणि प्रसिद्धी हक्कांसाठी न्यायालयाकडे मदत मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लोक अभिनेत्याची कॉपी करणे आणि त्याच्या संमतीशिवाय त्याचा आवाज वापरण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. Don't call me bhiddu दुसरीकडे, गेल्या वर्षी अनिल कपूरनेही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवाय, या वर्षी जानेवारीमध्ये अनिल कपूरने केस जिंकली होती. त्यात त्यांनी 'झाकस' या शब्दासह त्याचे कॅचफ्रेज, त्याचे नाव, आवाज, बोलण्याची पद्धत, प्रतिमा, उपमा आणि देहबोली संरक्षित करण्याची मागणी केली होती. त्याचा वापर करू नये, असे ते म्हणाले.