गंगा पूजनानंतर मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

    दिनांक :14-May-2024
Total Views |
वाराणसी,
Modi filled nomination उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे वाराणसी हे देशाचे प्रमुख निवडण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१९ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी सादर केली आणि विजयाची नोंद करण्यात यश मिळवले.
 
 
modi
 
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. वाराणसी लोकसभा जागेसाठी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सोमवारी सुमारे 4 तासांचा रोड शो केला. श्री काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचून पूजा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काशीच्या जनतेला पुन्हा एकदा खासदार निवडून आणण्याची नाही तर थेट मतदान करून देशाचा 'नायक' म्हणजेच पंतप्रधान निवडण्याची संधी मिळाली आहे. Modi filled nomination त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान प्रथम बनारसच्या दशाश्वमेध घाटावर पोहोचले. यानंतर कालभैरव मंदिराला भेट दिली. त्यांच्या नामांकनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.